भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागील अनेक सामन्यांमध्ये त्याने धमाकेदार खेळी तर केलीच त्याचबरोबर त्याने विविध प्रकारचे शॉट्स खेळत चाहत्यांची मने जिंकली. त्याने काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या दौऱ्यातील टी20 मालिकेत शतकी खेळी केली. नुकतेच त्याला एका मुलाखतीत विचारले गेले की त्याचा सामना विराट कोहली याच्याशी झाला तर कोण जिंकेल? या प्रश्नाचे उत्तर त्याने अत्यंत मजेशीरपणे दिले.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला इएसपीएन क्रिकइंफोवर विराट कोहली (Virat Kohli) आणि तुझ्यात एकटक पाहण्याची स्पर्धा झाली तर कोण जिंकेल? असा प्रश्न विचारला गेला. त्याचे उत्तर देण्याआधी त्याने थोडा विचार केला आणि म्हणाला, “मी” हे बोलल्यावर तो मोठ्याने हसला. यादरम्यान त्याने वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात तुलना केली, तर बुमराह पोलार्डवर जड पडेल.
या मुलाखतीमध्ये सूर्यकुमारला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याने अगदी बरोबरी दिली. यावेळी त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स सामन्यांचा उल्लेखही केली. आयपीएलमध्ये सूर्यकुमार मुंबईकडून खेळतो. त्याने मागील वर्षीच भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2022च्या हंगामात आतापर्यंत 31 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली. यामुळे तो एकाच वर्षांत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
त्यामध्ये त्याने 46च्या सरासरी, 187.43च्या स्ट्राईक रेटने 1164 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो एका कॅलेंडर वर्षात टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय आणि दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला. तसेच त्याने एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दोन शतक करण्याची कामगिरी केली. हे करताना त्याने रोहित शर्मा याची बरोबरी केली. रोहितने 2018मध्ये असे केले होते, तर सूर्यकुमारने याचवर्षी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक केले होते. Suryakumar Yadav Told who will win between him & Virat Kohli On Staring Contest
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता बास झालं! न्यूझीलंडच्या दिग्गजाने देखील म्हटले, पंतला नाहीतर ‘या’ खेळाडूला द्या संधी
कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज






