आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (16 मे) अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी लढत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान हा सामना होईल. लखनऊच्या घरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यासाठी लखनऊला पोहोचल्यानंतर मुंबईचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याने एक खास ट्विट केले.
गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान थेट लढत होण्याची शक्यता आहे. हा सामना जिंकून मुंबई 16 गुणांवर जाण्याचा प्रयत्न करेल. तर, मुंबईला पराभूत केल्यानंतर अखेरच्या सामन्यातही विजय मिळवून प्ले ऑफ्सचे तिकीट पक्के करण्याचा लखनऊचा मानस असणार आहे. हा सामना इकाना स्टेडियमवर खेळला जाईल.
लखनऊ येथे पोहोचल्यानंतर सूर्यकुमारने ट्विट करत लिहिले,
मुस्कुरा रहे हैं क्योंकि लखनऊ में हैं। 🤙 pic.twitter.com/DNOPyNP5CL
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) May 15, 2023
‘मुस्कुरा रहे है क्यूकी लखनऊ मे है’ त्याच्या या ट्वीटचा अर्थ असा होता की, लखनऊ येथे येणाऱ्या पाहुण्यांना ‘मुस्कुराये आप लखनऊ मे है’ असे म्हटले जाते.
सूर्यकुमार यादव या संपूर्ण हंगामात शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. खराब सुरुवातीनंतर त्याने मागील सात सामन्यात तुफानी फलंदाजी केली. अखेरच्या सात सामन्यातील कामगिरीवर नजर टाकले दिसून येते की, 68.33 च्या सरासरीने त्याने 413 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 202 असा तगडा राहिला. यामध्ये 4 अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे.
उभय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
लखनऊ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान
(Suryakumar Yadav Tweet After Reaching Lucknow For Match Against Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ
IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच