---Advertisement---

थेट हृदयावर वार! झंझावाती अर्धशतकानंतर सूर्यकुमारची मन जिंकणारी कृती, Video व्हायरल

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 5:31 PM
Suryakumar-Yadav-Video
---Advertisement---

भारतीय संघाला तिसरा टी२० सामना जिंकून देत ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ ने आघाडी घेऊन देण्यात सलामीवीर सूर्यकुमार यादव याचा मोठा वाटा राहिला. सूर्यकुमारने या सामन्यात रौद्र रूप दाखवत झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १९ षटकातच सामना जिंकला. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, ज्याने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. 

वेस्ट इंडिजच्या (West Indies vs India) १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने सलामीला फलंदाजीला येत ४४ चेंडूत ७६ धावांची प्रशंसनीय खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ७ चौकारही मारले. कर्णधार रोहित शर्मा ११ धावा करून रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) या खेळीने भारतीय संघाला (Team India) विजय मिळवून देण्यात हातभार लावला. त्याच्या या खेळीचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देऊन करण्यात आले.

या सामन्यानंतर सूर्यकुमारने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकणारे काम केले. त्याने सेंट किट्सच्या वॉर्नर पार्क स्टेडियमवर सामना पाहायला आलेल्या चाहत्यांजवळ जाऊन त्यांना स्वत:ची स्वाक्षरी (Suryakumar Yadav Heartwarming Gesture) दिली. काहींनी आपल्याजवळ असलेल्या बॅट, टोपी त्याला देत त्यावर स्वाक्षरी करून घेतली. तसेच काहींनी सूर्यकुमारसोबत सेल्फीही काढल्या. सूर्यकुमारच्या या कृतीने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची हृदये जिंकली आहेत.

बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) या खास क्षणाचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओ लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.

दरम्यान तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून कायले मेयर्कने सर्वाधिक धावा केल्या. ५० चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ७३ धावा केल्या. त्याच्याखेरीज रोवमन पॉवेलने २३ धावांचे योगदान दिले. भारताकडून या डावात भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक २ विकेट्स काढल्या.

प्रत्युत्तरात भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले. तसेच यष्टीरक्षक रिषभ पंतने नाबाद ३३ धावा फटकावल्या. तर श्रेयस अय्यरने २४ धावांची खेळी केली. आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील चौथा टी२० सामना शनिवारी (०६ ऑगस्ट) होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

WI vs IND | शेवटचे दोन टी२० सामने रद्द होणार? खेळाडूंपुढे निर्माण झालीये मोठी अडचण

दुखापतग्रस्त असूनही रोहितने गाजवले मैदान! चाहते म्हणाले, ‘कॅप्टन असावा तर असा’

CWG 2022 | पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात ४ पदकांची भर, वाचा खेळाडूंची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---