‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फेम दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा आज (२१ जानेवारी) ३६ वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अनेक आठवणींवर त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकली जात आहे.
छोट्या पडद्यापासून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या सुशांतचा प्रवास बॉलिवूड अभिनेत्यापर्यंत झाला होता. त्याचा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. त्यावेळी त्याने धोनीची भूमिका हुबेहुब निभावल्याने मोठे कौतुक झाले होते.
धोनीची भूमिका निभावण्यासाठी सुशांतने मोठी मेहनत घेतली होती. चित्रपट तयार होण्याआधी सुशांतने धोनी टिकीट कलेक्टरची नोकरी करत असताना ज्या रेल्वे क्वार्टरमध्ये राहयचा तेथील अन्य टिकीट कलेक्टर असलेल्या धोनीच्या साथीदारांची भेट घेतली होती. एवढेच नाही तर तो काही दिवस त्यांच्याबरोबर राहिला देखील होता. यादरम्यान सुशांतने धोनीबद्दल माहिती घेतली होती. तसेच तो तिकीट कलेक्टरचे कामही शिकला होता.
या अनुभवाबद्दल सुशांत म्हणाला होता की या अनुभवामुळे त्याला धोनीची भूमिका साकारण्यासाठी मदत झाली होती. तो म्हणाला होता, ‘धोनीची क्रिकेट कारकिर्द घडण्याआधीचे आयुष्य समजून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्याच्या साथीदारांनी माझी पूर्ण मदत केली. रेल्वेमध्ये प्रवास करण्याबरोबरच त्यांनी मला रेल्वे क्वार्टरमध्ये रहाण्याची परवानगीही दिली होती.’
सुशांतची मुख्य भूमिका असलेला ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट’ २०१६ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत व्यतिरिक्त दिशा पटानी, कियारा आडवाणी, अनुपम खेर यांनी देखील काम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वेंकटेशला मिळणार डच्चू? दुसर्या वनडेत अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन
केव्हा, कुठे आणि कधी रंगणार दक्षिण आफ्रिका-भारत दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही
चक्क सचिन तेंडुलकरचे पैसे बुडवले? अखेर सचिनचाही ‘ही’ लीग खेळण्यास नकार