---Advertisement---

सुशील पुरता फसला! निर्दयीपणे केली होती सागरला मारहाण, व्हिडिओ आला समोर

On: शुक्रवार, मे 28, 2021 9:47 PM
---Advertisement---

भारतीय कुस्तीचा सरताज मानला जाणारा दुहेरी ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमार यांच्यासमोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. युवा कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी सुशील व त्याच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता, सुशील कुमार हा सागर राणा याला मारहाण करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ते या प्रकरणात पुरते अडकण्याची चिन्हे आहेत.

काय आहे हे प्रकरण
सुशील कुमार यांचे सासरे व जगप्रसिद्ध भारतीय मल्ल सतपाल यांचा दिल्लीस्थित छत्रसाल आखाडा आहे. याठिकाणी अनेक तरुण कुस्तीपटू प्रशिक्षण घेत असतात. ४ मे रोजी या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद झाल्याची बातमी समोर आली होती. सागर राणा व त्याचे मित्र सोनू आणि अमित कुमार या तरूण खेळाडूंना काही वरिष्ठ कुस्तीपटूकडून मारहाण झाली होती. यापैकी सागर राणा याचा काही दिवसांनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी दोन वेळा ऑलिम्पिक विजेता भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला. त्यानंतर फरार झालेल्या सुशीलकुमार व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वॉरंट जारी केलेले. अखेरीस, २३ मे रोजी सुशील व त्याचा साथीदार अजय यांना दिल्ली शेजारील मुंडका येथून ताब्यात घेण्यात आले.

व्हिडिओ आला समोर
सुशील कुमार व त्याच्या साथीदारांनी सागर राणा आणि त्याच्या मित्रांना केलेल्या मारहाणीचा एक्स व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये सुशील कुमार हातात काठी घेऊन जमिनीवर पडलेल्या सागरला जोरदार मारहाण करताना दिसतोय. त्याचे साथीदार देखील त्यात त्वेषात असलेले दिसत आहेत. अल्पावधीतच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांना आता मजबूत पुरावा सापडला आहे.

भारताचा अव्वल कुस्तीपटू होता सुशील
सुशील कुमार हा भारतासाठी दोन ऑलिम्पिक मेडल मिळवणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.तसेच त्याने सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारत सरकारने त्याच्या या उपलब्धीचा सन्मान करताना त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

एका चेंडूत ६ धावा हव्या असताना धोनीला कुठे गोलंदाजी करशील? पॅट कमिन्सने दिले ‘हे’ उत्तर 

बुडत्याला काठीचा आधार! सुशील कुमारची ‘ही’ मागणी कोर्टाने केली मान्य

पुन्हा पाहायला मिळणार ‘गेल स्टॉर्म’! ‘या’ संघाशी झाला करारबद्ध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---