टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवसाला (२६ जुलै) सुरुवात झाली आहे. यात भारताची सुरुवात चांगली झाली असली, तरीही काही महिला टेबल टेनिसमध्ये मात्र भारताला सपाटून मार खावा लागला आहे. आपला दुसरा राऊंड खेळत असलेली सुतीर्थ मुखर्जीला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत आणि पोर्तुगाल संघात महिला टेबल टेनिसचा दुसरा राऊंड पार पडला. या सामन्यात भारतीय स्टार टेबल टेनिसपटू सुतीर्थ मुखर्जी जागतिक क्रमवारीत ५५ व्या क्रमांकावर असलेल्या पोर्तुगालच्या फू यूकडून ४-० ने पराभूत झाली आहे. (Sutirtha Mukherjee goes down to higher ranked Fu Yu (WR 55) 0-4 in 2nd round)
#TableTennis :
Sutirtha Mukherjee goes down to higher ranked Fu Yu (WR 55) 0-4 in 2nd round. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/8o3TnW4BBq— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2021
फू यूने सुतीर्थचा ११-३, ११-३, ११-५, ११-५ असा पराभव केला आहे.
तत्पूर्वी शनिवारी (२४ जुलै) झालेल्या पहिल्या राऊंडच्या सामन्यात सुतीर्थने स्वीडनच्या लिंडा बर्जस्ट्रॉमला ४-३ने पराभूत केले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ