वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने ६४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर उभय संघातील दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहितकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी होते. परंतु टी-२० मालितील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. रोहित या सामन्यात अपयशी ठरला आणि हा विक्रम करण्याची संधीही गमावून बसला. न्यूझीलंडची महिला क्रिकेपटू सूजी बेट्सने आता हा विक्रम नावावर केला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) पुरुषांमध्ये सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित आंतरराष्ट्रीय टी-२० मधील त्याच्या ३५०० धावा पूर्ण करू शकत होता. तो अशी कामगिरी करणारा पुरुष आणि महिला क्रिकेटमधील पहिला खेळाडूही बनला असता. मात्र, मागच्या दोन सामन्यांमध्ये रोहित अपयशी ठरल्यामुळे सूजी बेट्स (Suzie Bates) हिने त्याच्या आधी हा विक्रम केला. सूजी बेट्स आता महिला आणि पुरुष प्रकारातील पहिली अशी खेळाडू ठरली आहे, जिने ३५०० टी-२० धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकले असले तरी, रोहित त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्याने टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एकही धाव केली नाही. तसेच तिसऱ्या सामन्यात ११ धावा केल्यानंतर दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. रोहितने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ३४५४ टी-२० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडची ३४ वर्षीय खेळाडू सूजी बेट्स टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी तिने १२७ टी-२० सामने खेळले होते. या सामन्यांपैकी १२४ सामन्यांमध्ये तिने फलंदाजी केली होती आणि ३४७१ धावा केलेल्या. यादरम्यान तिने एक शतक आणि २२ अर्धशतक ठोकले होते. नाबाद १२४ धावा ही तिची सर्वात मोठी खेळी होती. स्ट्राईक रेट १११ होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने ३४ धावा केल्या आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३५०५ धावा केल्या.
फलंदाजीसोबत वेगवान गोलंदाजाच्या रूपात सूजीने टी-२० प्रकारात ५० विकेट्स देखील घेतल्या आहेत. २६ धावा खर्च करून ४ विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने १४२ सामन्यांमध्ये ४१ च्या सरासरीने ५०४५ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतक आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतासाठी मध्यरात्री ‘सुर्या’ चमकला! अर्धशतक झळकावल्यानं संघात ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात
भारताला भिडण्यापूर्वी झिम्बाब्वेनं रचलाय इतिहास, पहिल्यांदाच केली ‘ही’ विशेष कामगिरी
CWG 2022। उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! फक्त करावी लागेल ‘ही’ एक कामगिरी