पुणे। स्वामिनी तिकोणे, प्रणिता कलापुरे, रुही भिसे यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने आयोजित हौशी खेळाडूंच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलींच्या गटातून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकार्याने व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील तिस-या फेरीत स्वामिनी तिकोणेने इशिता पाटीलवर १५-४, १५-० असा, प्रणिता कलापुरेने मृणाल देशमुखवर १५-८, १५-१० असा, तर रुही भिसेने सई पाटणकरवर १५-४, १५-६ असा विजय मिळवला. यानंतर निशिका खिंवसराने प्रणाली डोईफोडेवर १२-१५, १५-११, १५-१२ असा, तर सिया बेहेडेने ज्ञानेश्वरी वायळवर १३-१५, १५-९, २१-१९ असा विजय मिळवला.
निकाल – तिसरी फेरी – १३ वर्षांखालील मुली –
सफा शेख वि. वि. अनुष्का जगताप १५-२, १५-६,
पीयुषा फडके वि. वि. अंजली कुलकर्णी १५-३, १५-८,
श्रींजनी समादार वि. वि. संमती रूगे १५-१३, १७-१५,
सारा गुजराथी वि. वि. अदिती साबळे १५-५, १५-६,
आर्या भारती वि. वि.श्रेया चौधरी १५-७, १६-१४,
संस्कृती पवार वि. वि. रिद्धीमा जोशी १५-४, १५-८,
जुई हळणकर वि. वि. आर्या कंधारे १५-०, १५-१०,
सेजल चौधरी वि. वि. श्लोका तासे १५-७, १६-१४,
पूर्वा वालवंडे वि. वि. धनी सक्सेना १५-७, १५-११,
प्रणिका ठाकरे वि. वि. मधुरा करंदीकर १५-१०, १५-१२,
युतिका चव्हाण वि. वि. तन्वी गुप्ते १५-११, १५-७.
१३ वर्षांखालील मुले –
सुदीप खोरटे वि. वि. कृष्णनील गोरे १५-४, १५-८,
विहान चंगेडिया वि. वि. पार्थ मिराशी ६-१५, १५-९, १५-९,
स्वरीत सातपुते वि. वि. तनिष दरपे १५-३, १५-६,
श्रेयस मसळेकर वि. वि. अंश अगरवाल १५-२, १५-५,
केविन पटेल वि. वि. श्रीखर झार्गद १५-५, १५-१३,
अथर्व गोस्वामी वि. वि. निनाद काळे १५-७, १५-११,
रिशीता पुडके वि. वि. आर्यन पटवर्धन १५-५, १५-७,
निक्षेप कात्रे वि. वि. ईशान महाबळेश्वरकर १५-६, १५-१०,
पार्थ भांगय वि. वि. अर्णव खरे १५-८, १५-८,
श्रेयस लागू वि. वि. शांतनू निखारे १५-७, १५-४,
आर्यन गाडगीळ वि. वि. अर्चित वसगाडेकर १५-६, १५-२.
१५ वर्षांखालील मुली –
सिमरन धिंग्रा वि. वि. काश्वी केडिया १५-२, १५-३,
वीरा पोटफोडे वि. वि. अदिती निंबोळकर १५-९, ८-१५, १५-१०,
पवित्रा गड्डम वि. वि. हेली पटेल १५-४, १५-५.