पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी साधारण होती. ज्यामध्ये खेळाडूंनी एकूण 6 पदके जिंकली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवले होते. ज्यामध्ये भारताच्या खात्यात एकूण 6 पदके आली. ज्यामध्ये भारताने 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र, यावेळी भारताच्या खात्यात एकही सुवर्ण आले नाही. यापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली होती. जी भारताची एका ऑलिम्पिकमधील सर्वोच्च संख्या होती.
नेमबाजीमध्ये भारताला तीन पदके मिळाले. ज्यात मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचा समावेश आहे. यासह ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रासाठी पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. कोल्हापूरचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. स्वप्नीलच्या कुसाळेच्या या यशानंतर महाराष्ट्र सरकारने त्याला 2 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. स्वप्नीलच्या आधी खाशाबा जाधव यांनी महाराष्ट्राला पहिला कांस्य पदक 1952 मध्ये मिळवून दिला होता.
50 मीटर एअर रायफल या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये (बसून, झोपून आणि आणि उभं राहून) निशाणा लावावा लागतो. स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण 451.4 इतका स्कोअर केला. या स्पर्धेत चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 463.6 होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला
स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली. तो कोल्हापुरच्या कांबळवाडी गावातून आला आहे, त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे. तारुण्यात, त्याला दोन खेळांपैकी एक निवडावा लागला, परंतु त्याने नेमबाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नील 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल 4 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळवता आले नाही. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी भारताला नीरज चोप्राकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या. मात्र तो फक्त रौप्यपदकापर्यंत पोहोचला. याशिवाय सुवर्णपदकासाठी पात्र ठरलेल्या विनेश फोगटला 100 ग्रॅम अति वजनामुळे अंतिम फेरीपूर्वीच अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश सुवर्ण पदक आणण्यासाठी प्रबळ दावेदार दिसत होती.
हेही वाचा-
IND VS AUS; विराट कोहली एमसीजी मध्ये सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणार?
रोहित-विराटपासून, सुनिल छेत्री-राफेल नदाल पर्यंत, या वर्षात अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती
अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय संघ ठरला चॅम्पियन, फायनलमध्ये बांग्लादेशला लोळवले