स्वित्झर्लंड दुतावासाने भारतीय सायक्लिंग संघाला व्हिसा देण्यास नकार दिला आहे. भारतीय संघाने स्वित्झर्लंडमधील युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल ज्युनियर ट्रॅक सायक्लिंग विश्वचषक 2018मध्ये सहभाग घेतला असून ही स्पर्धा 15-19 ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे.
स्वित्झर्लंडच्या दुतावासानुसार, या कागदपत्रातील माहिती ही अपूर्ण असून भारतीय संघास येथे राहण्यास परवानगी नाही. तसेच व्हिसा संपण्याच्या आतच देश सोडून जाणे बंधनकारक आहे.
यासंदर्भात भारतीय सायक्लिंग फेडरेशन आणि एशियन सायक्लिंग कॉन्फिडरेशनचे सचिव ओंकार सिंग यांनी स्वित्झर्लंडच्या दुतावासाला तात्पुरता व्हिसा देण्याची विनंती केली आहे.
“आम्ही कागदोपत्री सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत तरीही त्यांनी व्हिसा देण्यास नकार दिला”, असे सिंग यांनी या घटनेची स्पष्टता देताना म्हटले.
“त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या भेट देण्याबाबत आणि येथे राहण्याबाबत अनिश्चितता असून आम्ही या निमंत्रण पत्रिकेसोबत अजून काही महत्त्वाचे कागद जोडले आहेत.”
“तसेच ऑनलाईन रजिस्टर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण याचा व्हिसाशी काहीही संबंध नाही”, असे सिंग यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
फेडरेशन या स्पर्धेच्या आयोजकाशी आणि भारतीय खेळ मंत्रालयाशी या बाबतीत चर्चा करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–इशांत शर्माने दाखवला आपल्या गोलंदाजांवर ठाम विश्वास
–सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध