---Advertisement---

बापरे बाप! अवघ्या 15 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला ‘हा’ संघ, 5 फलंदाज शून्यावर तंबूत

Sydney-Thunder
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग 2022-23 स्पर्धेत शुक्रवार (दि. 16 डिसेंबर) हा ऐतिहासिक दिवस ठरला. कारण, सिडनी शोग्राऊंड स्टेडिअम येथे सिडनी थंडर विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स संघात एक लाजीरवाणा विक्रम रचला गेला. हा लाजीरवाणा विक्रम सिडनी थंडर संघाच्या नावावर झाला. या सामन्यात ऍडलेड संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजीचे उत्तर सिनडी संघाकडे नव्हते. त्यामुळे त्यांचा आख्खा संघ अवघ्या 15 धावांवर तंबूत परतला. अशाप्रकारे ही टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटी धावसंख्या ठरली.

झाले असे की, बिग बॅश लीग 2022-23 (Big Bash League 2022-23) स्पर्धेच्या हंगामातील पाचवा सामना सिडनी थंडर विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स (Sydney Thunder vs Adelaide Strikers ) संघात खेळला गेला. या सामन्यात ऍडलेड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ऍडलेड संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 139 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान पार करताना सिडनीचा आख्खा संघ अवघ्या 15 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे हा सामना ऍडलेड संघाने 124 धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला.

वेगवान गोलंदाज हेन्री थॉर्नटन आणि वेस एगरची जादू
ऍडलेड संघाचे आव्हान पाहता हा सामना सिडनी संघ सहजरीत्या जिंकेल असे वाटत होते. मात्र, सर्वकाही उलट झाले. ऍडलेड संघाचे वेगवान गोलंदाज हेन्री थॉर्नटन (Henry Thornton) आणि वेस एगर (Wes Agar) यांनी सिडनीच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले.

सिडनी संघाच्या दहाच्या दहा फलंदाजांना 5 धावांचा आकडाही पार करता आला नाही. सर्व खेळाडूंची धावसंख्या एखाद्या मोबाईल नंबरप्रमाणे वाटत होती. सिडनीच्या खेळाडूंनी अनुक्रमे 0, 0, 3, 0, 2, 1, 1, 0, 0, 4, 1 अशा धावा केल्या. तब्बल 5 फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले.

या दोन्ही गोलंदाजांनी मिळून एकूण 9 विकेट्स आपल्या खिशात घातल्या. तसेच, सिडनीच्या आख्ख्या संघाला 5.5 षटकात 15 धावांवर तंबूत धाडले. या सामन्यातील कामगिरीसाठी हेन्रीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने 2.5 षटके गोलंदाजी करताना 3 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. दुसरीकडे, एगरने 2 षटकात 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, मॅथ्यू शॉर्ट यानेही 1 विकेट आपल्या नावावर केली.

ऍडलेड संघाचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड संघाकडून ख्रिस लिन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 36 धावा चोपल्या. यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त डी ग्रँडहोम यालाच 33 धावा करता आल्या. इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. तरीही संघाने 139 धावसंख्या गाठली.

यावेळी सिडनी संघाकडून गोलंदाजी करताना फजलहक फारूकी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त गुरिंदर संधू, डॅनियल सॅम्स आणि ब्रेंडन डगेट यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (sydney thunder vs adelaide strikers big bash league lowest innings totals in t20 format read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो हुकमी एक्का बनेल’, बांगलादेशच्या बत्त्या गुल करणाऱ्या स्टार खेळाडूची कार्तिककडून प्रशंसा
‘तू…डोक्यावर घेऊ नको’, द्विशतकानंतर ईशानने फोन करताच ‘अशी’ होती वडिलांची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---