---Advertisement---

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

---Advertisement---

सन 2020-21 मध्ये झालेला भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच विस्मरणीय होता. यामध्ये भारतीय संघाने या दौर्‍यावर केलेल्या शानदार प्रदर्शनासोबतच अशी काही दृष्य पाहायला भेटली जी कधीही विसरता येणार नाहीत. त्यातील एक दृष्य म्हणजे एका युवकाने आपल्या मैत्रिणीला क्रिकेट सामन्यादरम्यान केलेला प्रपोज.

सिडनीच्या क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात एका भारतीय चाहत्याने संपूर्ण जगासमोर आपले प्रेम व्यक्त केले होते. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका भारतीय युवकाने आपल्या मैत्रिणीला हातात अंगठी घेऊन गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते.

हे पाहून मुलगी आनंदाने आश्चर्यचकित झाली आणि वेळ न गमावता लगेच तिने होकार दिला. हे पाहून आजूबाजूला बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्या मुलीने त्या युवकाला मिठी मारली. या सामन्यानंतर हा व्हिडिओ संपूर्ण जगभरात सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. अशा या सर्व जगासमोर आपले प्रेम व्यक्त करण्याने या युवकाचे खूप कौतुक झाले होते.

https://www.instagram.com/p/CISWvzSlK7k/?utm_source=ig_web_button_share_sheet

या जोडप्यातील मुलाचे नाव दिपेन मंडलिया आणि त्या मुलीचे अर्थात त्याच्या प्रेमिकेचे नाव रोज विम्बुश आहे. हे दोघेही आयपीएल 2021 बद्दल खूप उत्सुक असून दीपेनने सलामीच्या सामन्याआधी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या प्रेमिकेसोबत तो आयपीएलमध्ये आरसीबी संघाला साथ देत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या अपेक्षांनुसार आरसीबीच पहिल्या सामन्याचा विजेता ठरला. २ विकेट्सने त्यांनी मुंबई इंडियनसचा पराभव केला.

https://www.instagram.com/p/CNcN_CLlE5N/?utm_source=ig_web_button_share_sheet

या प्रपोजचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी या जोडप्याची मुलाखतही घेतली होती. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) जेव्हा मुलीला जेव्हा विचारण्यात आले की, तिला याबद्दल माहित होते का? आणि तीला याबद्दल कसे वाटते? यावर तीने उत्तर दिले की, “मला या बद्दल काहीही माहित नव्हते आणि यावेळी मी खूप भारावून गेलेली आहे.”

नंतर जेव्हा भारतीय चाहता दीपेन मंडलिया याला या प्रपोज बाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले होते की, “माझे प्रेम व्यक्त करण्याकरीता यापेक्षा दुसरी कोणती चांगली जागा असूच शकत नव्हती. कारण आम्ही दोघेही क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहोत.आम्ही जवळपास दीड वर्षापासून एकत्र असून एक महिन्यापासून मी याची योजना आखत होतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---