येत्या १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने देशांतर्गत क्रिकेटला पुनश्च एकदा सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सगळ्याच संघांनी कसून तयारी सुरू केली असून आपापले संघ जाहीर केले आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने देखील या स्पर्धेसाठीच्या बंगालच्या राज्य संघाची घोषणा केली आहे.
या संघाचे कर्णधारपद अनूस्तूप मजूमदारकडे सोपविण्यात आले आहे. त्याचवेळी उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रीवत्स गोस्वामीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मात्र अनुस्तूपकडे केवळ टी-२० स्पर्धेसाठी नेतृत्व देण्यात आल्याचेही यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी बंगालच्या कर्णधारपदाची धुरा अभिमन्यू ईश्वरनच्या खांद्यावर होती. त्याने मनोज तिवारीनंतर बंगालचे नेतृत्व केले होते. २०१९ सालच्या रणजी करंडक स्पर्धेत बंगालला अंतिम फेरीत पोहोचविण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. मात्र त्यांनतर त्याच्या कामगिरीत घसरण झाली आहे. मागील १० सामन्यात त्याची सरासरी अवघी १७.२० अशी आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतले जात असल्याचे म्हंटले जात आहे.
मात्र याविषयी अभिमन्यूशी चर्चा करूनच निर्णय घेतल्या गेल्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष अभिषेक दालमिया आणि सचिव स्नेहाशिष गांगुली यांनी ईश्वरन, मजूमदार आणि गोस्वामी यांच्याशी संवाद साधून त्यांना निर्णयाची कल्पना दिल्याचे समजते. तसेच कर्णधारपदाचा दबाव हटवल्याने अभिमन्यू ईश्वरन अधिक मोकळेपणाने फलंदाजी करू शकेल, असे बंगालच्या निवड समितीचे मानणे आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी बंगालचा समावेश ‘ब’ गटात करण्यात आला असून त्यांचे साखळी सामने कोलकाता येथेच खेळवले जातील.
संपूर्ण संघ-
अनूस्तूप मजूमदार (कर्णधार), श्रीवत्स गोस्वामी (उपकर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, मनोज तिवारी, सुदी चटर्जी, ईशान पोरेल, रितविक रॉय चौधरी, विवेक सिंह, शाहबाज अहमद, अर्नब नंदी, मुकेश कुमार, आकाशदीप, अभिषेक दास, मोहम्मद कैफ, अरित्रा चटर्जी, सुवांकर बल, रितिक चटर्जी, प्रयास रे बरमन, कैफ एहमद, रवि कांत सिंह
महत्वाच्या बातम्या:
– डोंबिवली- बोरीवलीकडे टीम इंडियाची धुरा, मुंबईकर रहाणे कर्णधार तर रोहित उपकर्णधार
– जेव्हा ब्रायन लाराला स्लेजिंग करणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात, वाचा खुद्द पॉंटिंगने सांगितलेला किस्सा
– व्हिडिओ: सराव सामन्यात दिसली आक्रमक श्रीसंतची झलक! तिखट मारा करत फलंदाजांना केले स्लेजिंग






