सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना काल (२९ जानेवारी) अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानावर पार पडला. या सामन्यात बडोद्याच्या संघाने आपला शानदार फॉर्म कायम राखत पंजाबच्या संघाचा २५ धावांनी पराभव केला. यासह त्यांनी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ते शनिवारी विजेतेपदासाठी तामिळनाडूच्या संघाशी झुंज देतील.
बडोद्याच्या कर्णधाराचे अर्धशतक
या सामन्यात मनदीप सिंगच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून दवाचा परिणाम लक्षात घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बडोद्याने कर्णधार केदार देवधरच्या ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ३ बाद १६० धावांची मजल मारली. केदारला युवा कार्तिक काकडेनेही अर्धशतक झळकावत उत्तम साथ दिली. कार्तिकने नाबाद ५४ धावा करतांना केदारसह तिसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी रचली.
WATCH: Kedar Devdhar's captain's knock of 64 (49) vs Punjab 👍👍
The Baroda skipper, who opened the batting, hit 4 fours & 3 sixes in his solid 64-run knock in the #SyedMushtaqAliT20 #SF2. 👌👌 #PUNvBDA
Video 👉 https://t.co/5JG3S1vLsD pic.twitter.com/Xwuq94euht
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
पंजाबकडून अनुभवी गोलंदाज संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र त्यासाठी त्यांनी अनुक्रमे ३५ आणि ३१ धावा मोजल्या. याशिवाय युवा लेगस्पिनर मयंक मार्कंडेयने २९ धावा देत एक बळी घेतला.
मनदीप सिंगची एकाकी झुंज
या लक्ष्याचा पाठलाग करतांना पंजाबने आपले दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. अभिषेक शर्मा ५ तर सिमरन सिंग १५ धावांवर बाद होऊन तंबूत परतले. त्यांनतर अनुभवी गुरुकिरात मान आणि अनमोलप्रीत सिंग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पंजाबने नियमित अंतराने बळी गमावले. कर्णधार मनदीप सिंगने २४ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी करत पंजाबच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केला. परंतु, दुसऱ्या बाजूच्या फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्याचा प्रयत्न तोकडा पडला.
WATCH: Mandeep Singh's brave 42*(24) vs Baroda 👏👏
The Punjab skipper had suffered a shoulder injury while fielding but it didn't stop him from putting up a solid fight with the bat in the chase. 👍👍#PUNvBDA #SyedMushtaqAliT20 #SF2
Watch his knock 🎥👉 https://t.co/68Kvz9WXwT pic.twitter.com/E0IPDMO2dU
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
बडोद्याकडून लुकमन मेरीवालाने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २८ धावा देत ३ बळी पटकाविले. याशिवाय निनाद राठवाने दोन आणि अतीत शेठ, बाबाशफी पठाण व कार्तिक काकडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Skipper Kedar Devdhar & Karthik Kakade scored fifties while Lukman Meriwala scalped 3 wickets as Baroda beat Punjab by 25 runs to secure a place in the #SyedMushtaqAliT20 #Final. 👏👏
Watch the highlights of the #PUNvBDA #SF2 to relive the action 🎥👉 https://t.co/gMy6ycQmoQ pic.twitter.com/QRSAf4OxM6
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
नियमित कर्णधार कृणाल पंड्या वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळत नसतानाही बडोद्याने सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत हा विजय साकारला. आता विजेतेपदापासून बडोदा केवळ एक पाऊल दूर असून त्यासाठी अंतिम फेरीत त्यांना फॉर्मात असलेल्या तामिळनाडूला हरवण्याचे आव्हान असेल.
महत्वाच्या बातम्या:
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय
क्वारंटाईनमध्येही कोहली घेतोय फिटनेसवर मेहनत, वर्कआउट करतानाचा व्हिडिओ केला शेअर