---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत ‘या’ संघाकडून खेळणार दिनेश कार्तिक

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 3:31 PM
---Advertisement---

आगामी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी तमिळनाडूने आपला संभाव्य संघ जाहीर केला आहे. २६ खेळाडूंच्या या संघात भारतीय संघाचा आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू दिनेश कार्तिकचाही समावेश आहे. त्याच्याव्यतिरिक्त मुरली विजय व विजय शंकर यांचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे.

आयपीएल २०२१ मध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी खेळाडू सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. २० षटकांच्या या स्पर्धेनंतर आयपीएल २०२१ साठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू मुश्ताक अली स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. तमिळनाडूने घोषित केलेल्या २६ खेळाडूंच्या यादीत अरुण कार्तिक व वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांचादेखील समावेश आहे.

भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असलेले आर अश्विन, वाॅशिंग्टन सुंदर व टी नटराजन यांचा संघात सामवेश करण्यात आलेला नाही.

तमिळनाडू संघ-

दिनेश कार्तिक, मुरली विजय, बी अपराजित, बी इंद्रजीत, विजय शंकर, एम शाहरूख खान, सी हरि निशांत, प्रदोष रंजन पॉल, केबी अरूण कार्तिक, अक्षय श्रीनिवासन, एन जगदीशन, एम अभिनव, अश्विन क्राइस्ट, एम मोहम्मद, जी पेरियासामी, संदीप वाॅरियर, एस हरीश कुमार, के विग्नेश, आर सिलाम्बारासन, जे कौशिक, आर सोनु यादव, एम अश्विन, आर साइ किशोर, एम सिद्धार्थ, एल सत्यनारायणन, एम ई वाय अरूण मोझी

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND Test Live : कोहलीचे अर्धशतक, कांगारूंकडून टिच्चून गोलंदाजी; ६१ षटकात भारत ३ बाद १२८ धावांवर

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास! ‘या’ फलंदाजाने ८७ वर्षांपूर्वी झळकावले होते पहिले शतक

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---