बांग्लादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल पहिल्या डावात 118 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात तो फक्त 17 धावा करू शकला. आपल्या डावाची शानदार सुरुवात केल्यानंतर जयस्वाल मोठी खेळी खेळू शकला नाही. ज्यावर पाकिस्तानचे माजी दिग्गज बासित अलीनी प्रतिक्रिया दिली आहे. जयस्वाल बाद होण्याच्या पद्धतीवर बासित अलीनी प्रतिक्रिया दिली असून, जयस्वाल आता शिकला नाहीत तर कधी शिकणार? असे थेट म्हटले आहे.
बासित अली आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “बांग्लादेशविरुद्ध दोन्ही डावात चुकीचे शॉट्स खेळून जयस्वाल बाद झाला. तो माझा आवडता आहे पण आता त्याला आणखी खूप शिकायचे आहे. अशा प्रकारे तो त्याची विकेट गमावू नये. तो माझाही आवडता आहे. पण आता तो शिकलाच पाहिजे. आता शिकलो नाही तर कधी शिकणार?” असा थेट प्रश्न केला आहे. दरम्यान अश्या स्थितीत यशस्वी जयस्वाल दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक राहील. यशस्वी जयस्वाल युवा असून आगामी काळात तो नक्कीच भारतीय संघाचा स्टार होणार, यात शंका नाही. दुसऱ्या कानपूर कसोटीपूर्वी भारतीय संघ आणि यशस्वी जयस्वाल कानपूरमध्ये दाखल झाले आहेत.
यशस्वी जयस्वालने काही उत्कृष्ट विक्रम केले आहेत. घरच्या मैदानावर पहिल्या दहा डावात 750 हून अधिक धावा करणारा तो कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज आहे. तसेच त्याच्या पहिल्या दहा कसोटी सामन्यांमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तसेच या वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जयस्वाल सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. जयस्वालने 181 धावा करताच तो या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनेल. जयस्वालने आतापर्यंत 806 धावा केल्या आहेत. तर जो रूटने 976 धावा करुन अव्वलस्थानी आहे.
आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आहे. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून टीम इंडिया दुसऱ्या सामन्यातही फेव्हरेट असल्याचे दिसत आहे. तर जयस्वालला कानपूरमध्ये विशेष चमत्कार करण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा-
कानपूर कसोटीत कोहलीकडून; ‘विराट’ कामगिरी अपेक्षित! या विक्रमांवर असणार डोळा
IND vs BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित? क्युरेटरने खेळपट्टीबाबत केला मोठा खुलासा
“आम्ही डगआउटमध्ये…”, धोनीच्या अंपायरशी झालेल्या वादावर मोहित शर्माने तोडले मौन