---Advertisement---

अभय शर्मांना मागे टाकत ‘हे’ बनले भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाचे प्रमुख दावेदार

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 4:26 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा सपोर्ट स्टाफही लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गुरुवारी संघाच्या सपोर्ट स्टाफची घोषणा करू शकते. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर हे त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. अशा परिस्थितीत भारतीय संघाला आपल्या पुढील गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची वाट पाहावी लागत आहे. आतापर्यंत रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक व भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. आर श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. आता या दोन्ही पदांवर नवीन नावांची भरती होईल.

हे असतील नवे प्रशिक्षक
माध्यमांतील वृत्तानुसार, टी दिलीप हे भारतीय संघाचे पुढील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. दुसरीकडे, एनसीएचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतील. दिलीप काही काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ते नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासह होते. दिलीप यांना अभय शर्मांकडून आव्हान मिळत होतै. शर्मा हे भारत-अ, अंडर-१९ संघासोबत काम करत होते. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या शर्यतीत दिलीप यांनी अभय यांना मागे सोडले असून, ते पुढील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनू शकतात.

भारतीय संघ खेळणार न्यूझीलंडविरुद्ध
भारतीय क्रिकेट संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात टी२० व कसोटी मालिका खेळेल. जयपूर येथून टी२० मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर पुढील दोन टी२० सामने अनुक्रमे रांची व कोलकत्ता येथे होतील. तर, कसोटी सामने अनुक्रमे कानपूर व मुंबई येथे होतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---