प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना, भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा एक संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या संघाची संघ निवड नुकतीच करण्यात आली. या संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले. शिखर धवन या दौऱ्यावर प्रथमच भारताचे नेतृत्व करेल तर, राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी आता द्रविडच्या साथीदारांची ही नावे घोषित करण्यात आली आहेत.
हे असणार सहाय्यक प्रशिक्षक
श्रीलंका दौर्यावर राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाला मार्गदर्शन करतील. या दौऱ्यावर त्यांच्या जोडीला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस म्हाम्ब्रे तर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या पारस म्हाम्ब्रे यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर ते २०१५ पासून भारत अ व एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करतात.
टी. दिलीप यांच्याकडे प्रथमच भारतीय संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते यापूर्वी हैदराबाद क्रिकेट संघासोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच, त्यांनी भारतीय अ संघासह एका दौऱ्यावर गेलेले.
भारताचा श्रीलंका दौरा
पहिला वनडे सामना- १३ जुलै
दुसरा वनडे सामना- १६ जुलै
तिसरा वनडे सामना- १८ जुलै
पहिला टी२० सामना- २१ जुलै
दुसरा टी२० सामना- २३ जुलै
तिसरा टी२० सामना- २५ जुलै
टिप- सर्व सामने कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया.
महत्त्वाच्या बातम्या –
शुबमन गिल सलामीला फलंदाजी करताना कधीच खेळणार नाही पहिला चेंडू; ‘हे’ आहे कारण
राज की बात!! डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आर अश्विन करतो ‘या’ रननीतीचा अवलंब
विक्रमी सामन्यात अँडरसन बनला सर्वात दुर्दैवी आकडेवारीचा भाग; ‘हा’ नकोसा विक्रम झाला नावावर