कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) होणार आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण करणार आहे. त्याला भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
टी नटराजन भारताकडून वनडे पदार्पण करणारा २३२ वा खेळाडू ठरला आहे.
A massive day for @Natarajan_91 today as he makes his #TeamIndia debut. He becomes the proud owner of 🧢 232. Go out and give your best, champ! #AUSvIND pic.twitter.com/YtXD3Nn9pz
— BCCI (@BCCI) December 2, 2020
आयपीएलदरम्यान केले होते प्रभावित
आयपीएलच्या 13 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी20 मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. तो सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे.
टी नटराजनने 16 आयपीएल सामन्यांत 16 बळी घेतले असून या दरम्यान त्याची सरासरी 31.5 अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक 65-70 यॉर्कर चेंडू फेकले आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी –
तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या नटराजनने 20 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात 64 विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय त्याने 15 अ दर्जाचे सामने देखील खेळले आहेत. यात त्याने 16 विकेट्स घेतल्या आहे. तसेच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने 38 सामन्यात 35 विकेट्स घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS vs IND: तिसऱ्या वनडेत टीम इंडियाला प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान, कॅनबेरा येथे होणार सामना
इशारा देऊनही पाकिस्तानचे आणखी ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंड सरकार उचलणार कठोर पाऊल?
रोहितच्या निवडीवरून झालेल्या वादात भारतीय दिग्गजाची उडी, विराटचे केले समर्थन