विजय हजारे करंडक स्पर्धा २०२१-२२ पूर्वी तामिळनाडू संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज टी नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्नाटकविरुद्ध संघाने शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवल्यानंतर ही बातमी आली आहे. विजय हजारे करडंकासाठी तामिळनाडू संघाची घोषणा करण्यात आली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, एका सूत्राने सांगितले की, टी नटराजन पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएकडे जात आहे आणि आम्हाला माहित नाही की, तो किती काळ मैदानाबाहेर असेल. स्पर्धेपूर्वी नटराजनची दुखापत ही तामिळनाडू संघासाठी मोठे नुकसान आहे.
टी नटराजनसाठी दुखापत ही मोठी समस्या आहे. याआधी आयपीएल २०२१ दरम्यानही त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि तो सनरायझर्स हैदराबाद संघातून बाहेर होता. यावेळी पुन्हा त्याच्या दुखापतीमुळे त्याला घरच्या एका महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
विजय हजारे करडंकामध्ये तामिळनाडू संघाचे नेतृत्व विजय शंकर करणार आहे. दिनेश कार्तिक आणि वॉशिंग्टन सुंदरचेही या संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेपूर्वी दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर भारतात परतला होता. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. तर दिनेश कार्तिक आयपीएल २०२१ मध्ये खेळला होता. याशिवाय त्याने इंग्लंडमध्ये समालोचनातही हात आजमावला होता. त्याच्या उपस्थितीमुळे विजय हजारे करंडकामध्ये तामिळनाडू संघाला नक्कीच बळ मिळेल.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील विजयानंतर तामिळनाडू संघाचा आत्मविश्वास उंचावलेला दिसत आहे. पण आता 50 षटकांच्या स्वरुपात हा संघ कसा खेळेल? हे पाहणे बाकी आहे.
विजय हजारे करंडकासाठी तामिळनाडू संघ- विजय शंकर (कर्णधार), एन जगदीसन, दिनेश कार्तिक, सी हरी निशांत, शाहरुख खान, आर साई किशोर, मुरुगन अश्विन, संदीप वॉरियर, वॉशिंग्टन सुंदर, एम सिद्धार्थ, बी साई सुदर्शन, व्ही गंगा श्रीधर राजू, एम मोहम्मद, जे कौसिक, पी. सरवण कुमार, एल. सूर्यप्रकाश, बाबा इंद्रजीत, आर. संजय यादव, एम. कौशिक गांधी, आर. सिलांबरसन.
महत्त्वाच्या बातम्या-
बीबीएलची ‘प्लेयर ऑफ द ईयर’ राहिलेल्या हरमनप्रीतला आहे विश्वास, लवकरच सुरू होईल महिलांची आयपीएल
पंजाब किंग्ज संघाची साथ सोडून केएल राहुल आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ संघात करणार प्रवेश?






