भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याने गेल्या काही महिन्यात भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. याच कामगिरीनंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली होती. यानंतर त्याच्या आयुष्यात आता काय बदल आले आहेत? याबाबत त्याने भाष्य केले आहे.
मला वाटले नव्हते, भारतीय संघात खेळण्याची संधी मिळेल
नटराजन म्हणाला, “मी आयपीएल स्पर्धेनंतर घरी जाण्याचा विचार करत होतो. परंतु भारतीय संघात निवड झाल्यानंतर मी माझ्या मुलीला व्हिडिओ कॉलवर पाहिले होते. हा अनुभव मी व्यक्त करू शकत नाही. हा खूप खास अनुभव होता. हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. परंतु मी खूप आनंदी होतो. माझी मुलगी माझ्यासाठी खूप लकी आहे. तिच्या जन्मानंतर माझ्या आईने चिकनच्या दुकानावर काम करणे बंद केले आहे. माझ्या मित्रांनी आणि कुटुंबाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. छोट्या गावातून येऊन भारतीय संघात निवड होणे खूप मोठी गोष्ट होती. आता सर्वांनाच माझ्या गावाबद्दल माहीत आहे.”
भारतीय संघाची जर्सी परिधान करणे आयुष्यातील सर्वात खास क्षण
“माझ्या जर्सीवर तामिळनाडू संघाचा लोगो होता, तेव्हा मला आनंद झाला होताच. परंतु भारतीय संघाचा लोगो जर्सीवर लागणे खूप मोठी गोष्ट होती. मला असे वाटत होते की माझे स्वप्न सत्यात उतरले होते. जर मी चिन्नापमट्टीमध्ये असतो तर खूप धम्माल झाली असती. परंतु मी एकटा होतो आणि विलग्नवासात होतो,” असे नटराजन पुढे म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळाली होती स्पॉंसर्ड बॅट
जेव्हा नटराजनला विचारण्यात आले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फलंदाजी करण्यासाठी बॅट होती की नाही? यावर त्याने उत्तर देत म्हटले की, “मी जेव्हा तामिळनाडूसाठी खेळत होतो तेव्हा मी, माझा भाऊ अभिनव मुकुंदची बॅट वापरत. जेव्हा मी सुरुवातीला आयपीएल खेळत होतो तेव्हा फलंदाजीची गरज भासल्यास मी संघाची बॅट वापरत असे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मी वॉशिंग्टन सुंदरकडून बॅट घेतली होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेला दिलासा! कागिसो रबाडासह ‘हा’ दिल्लीकर मुकणार सुरुवातीच्या आयपीएल सामन्याला
धोनीने ‘तो’ सल्ला दिला अन् माझं नशीब बदललं; टी नटराजनने सांगतली ‘राज की बात’