---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटीतून विश्रांती घेतल्याबद्दल टी नटराजनने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला…

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 12:22 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० सत्रात उत्कृष्ट गोलंदाजी चे प्रदर्शन करणाऱ्या टी नटराजन याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुरुवातीला भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. पण नंतर सातत्याने खेळाडूंना होत असलेल्या दुखापतींमुळे त्याला संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. टी नटराजन हा एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा क्रिकेटपटू बनला होता. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिले. तसेच कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचे सोने करत आपल्या धारदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुंतवून ठेवले होते.

त्यानंतर आता मायदेशात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाहिल्या २ कसोटी सामन्यामध्ये टी नटराजन याने विश्रांती घेतली आहे. याबाबत त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

विश्रांती सुद्धा गरजेची आहे – टी नटराजन

आयपीएल २०२० ही स्पर्धा दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर लगेच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी टी नटराजन याला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. ऑस्ट्रेलिया दौरा असल्यामुळे त्याला कुटुंबाला भेटता आले नव्हते. याच कारणास्तव त्याने विश्रांती घेतली आहे.

नटराजन म्हणाला,” मला असे वाटते की विश्रांती घेणे गरजेचे आहे. गेल्या ६ महिन्यापासून मी कुटुंबासोबत वेळ घालवला नाही. परंतु जेव्हा भारतीय संघ चेन्नई कसोटी खेळेल आणि मी संघासोबत नसेल तेव्हा मला वाईट वाटेल.”

संघासोबत नाही याचे ही वाईट वाटते – टी नटराजन 

टी नटराजन याने मागील काही दिवसात भारतीय संघासोबत भरपूर वेळ घालवला आहे. तसेच बायो बबलमध्येही तो संघासोबत होता. त्यामुळे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमची ही त्याला आठवण येत आहे. जेव्हा भारतीय संघ चेन्नई कसोटी खेळत असेल तेव्हा तिकडे नसल्याचे ही त्याला वाईट वाटेल अशी भावना त्याने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारातील क्रिकेटमध्ये दिर्घकाळ खेळायचे आहे – टी नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याने भारतीय संघासाठी दिर्घकाळ तिन्ही प्रकारामध्ये क्रिकेट खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. पुढे तो म्हणाला, “मी माझ्या ताकदीवर आणखी काम करेल, हे पहिल्यांदाच आहे, जेव्हा मी ६ महिने सतत क्रिकेट खेळलो आहे. ताळेबंदीच्या काळात मी प्रशिक्षण घेत होतो म्हणूनच मी आयपीएल आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगले प्रदर्शन करू शकलो.”

महत्त्वाच्या बातम्या –

“भारतीय संघ विजयाचा १०० दक्के दावेदार आहे,” इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाचे भाष्य

जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो

दमदार सुरुवातीनंतरही भारतीय संघातून बाजूला केलेला सदागोपन रमेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---