मर्यादित षटकांची मालिका खेळून भारतात परतणाऱ्या नटराजनचा संघ सहकाऱ्यांसाठी खास संदेश, म्हणाला…

T natarajans special messege for teammates

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने टी20 मालिकेत शानदार विजय मिळवला. वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने सर्वांचेच लक्ष्य वेधले. त्याच्या गोलंदाजी कौशल्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. टी20 मालिकेअखेर त्याने भावुक संदेश देत संघसहकाऱ्यांचे आभार मानले आहे.

वनडे आणि टी20 सामन्यात केली जबरदस्त कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या कारकिर्दीतील पहिल्याच वनडे सामन्यात नटराजनने 2 गडी बाद केले. त्यानंतर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 6.91 च्या इकॉनॉमी रेटने धावा देत तब्बल 6 बळी टिपले.

नटराजनने शेअर केला खास संदेश

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. नटराजन या कसोटी मालिकेचा भाग नाही. त्यामुळे टी20 मालिकेनंतर तो भारतात परतणार आहे. त्याआधी त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून खास संदेश शेअर केला आहे.

ट्वीट करत नटराजन म्हणाला की, “मागील काही महिने नाट्यमय पद्धतीने गेले. भारतीय संघाबरोबर पहिल्यांदाच वेळ घालवला. स्वप्न साकार झाल्याचा क्षण या चॅम्पियन खेळाडूंनी आणखी खास बनवला. माझ्या सहकाऱ्यांनी सतत समर्थन व प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल प्रत्येकाचे आभार.”

नटराजनची आयपीएलमधील कारकीर्द

आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून खेळताना नटराजनने 16 सामन्यात 8.02 च्या इकॉनॉमि रेटने 16 बळी टिपले होते. 2 बाद 24 ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.

…म्हणून नटराजनला ‘यॉर्कर किंग’ नावाने संबोधले जाते

आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक यॉर्कर चेंडू फेकल्यामुळे नटराजनला ‘यॉर्कर किंग’ या नावाने संबोधले जाऊ लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत

‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक

धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…

ट्रेंडिंग लेख-

अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज

टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.