---Advertisement---

आता मेंटर बनणार युवी? प्रतिष्ठित लीगमध्ये ‘या’ संघाने दिली ऑफर

---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. युवराज सिंगला अबूधाबी टी10 लीगमधील न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघाचा मेंटर म्हणून प्रस्ताव देण्यात आला आहे. या संघात वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि इंग्लंडचा विश्वविजता कर्णधार ओएन मॉर्गनसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. युवराज याआधी अबूधाबी टी 10 लीगमध्ये खेळला आहे. 2019 मध्ये त्याने मराठा अरेबियन्ससाठी स्पर्धेत आपला दम दाखवलेला. मराठा अरेबियन्सनेच त्यावर्षी स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. त्याचवर्षी जूनमध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.

न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने अबूधाबी टी 10 लीगच्या आगामी हंगामासाठी प्रथमच आपला संघ उतरवला आहे. पोलार्ड आणि मॉर्गन यांच्याव्यतिरिक्त आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि पाकिस्तानचा आझम खान यांनाही संघात स्थान दिले गेले आहे.

संघाचे मालक सागर खन्ना यावेळी बोलताना म्हणाले, “कायरन पोलार्ड आणि ओएन मॉर्गन हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील मोठी नावे आहेत. दोघेही अतिशय धोकादायक खेळाडू असून, आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. हे खेळाडू आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. दोन्ही खेळाडूंमुळे प्रतिस्पर्धी संघांच्या मनात भीती निर्माण होईल. त्यांच्यातील हेच सारे गुण पाहून आम्ही त्यांचा संघात समावेश केला आहे.”

अबूधाबी टी10 लीगचा आगामी हंगाम 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. टी10 लीगमध्ये भाग घेणारा न्यूयॉर्क स्ट्रायकर्स हा अमेरिकेतील दुसरा संघ आहे. यापूर्वी नॉदर्न वॉरियर्स नावाने एक संघ या स्पर्धेत सहभागी होत आला आहे व त्यांनी विजेतेपद देखील मिळवलेय.
टी10 लीगबद्दल बोलायचे झाले तर, त्यात प्रत्येकी 10-10 षटकांचा सामना खेळला जातो. प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येकी 2 षटके टाकण्याची परवानगी दिली जाते. या स्पर्धेचे आतापर्यंत खेळले गेलेले सर्व हंगाम खूप यशस्वी झाले आहेत. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू यात भाग घेतात.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---