---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात ‘या’ भारतीय खेळाडूंनी केली शतके, संजू सॅमसनचाही समावेश

On: शनिवार, फेब्रुवारी 21, 2026 6:47 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रविवारी (२२ फेब्रुवारी) आयसीसी टी२० विश्वचषक २०२६चा सुपर-८चा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होणार आहे. याआधी दोन्ही संघांची काही आकडेवारी जाणून घेऊ.

या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३५ टी२० सामने खेळले गेले, ज्यामध्ये केवळ २ भारतीय फलंदाज असे आहेत जे सध्याच्या विश्वचषकाच्या खेळत असून त्यांनी दक्षिण आफ्रिेकेविरुद्ध शतके केली आहेत. यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यांत एक नाहीतर प्रत्येकी २-२ शतके केली आहे.

संजूने २०२४ पासून ते आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये १०७ (५०) धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आणि तिलकने एकाच सामन्यात शतके केली. १५ नोव्हेंबरला झालेल्या त्या सामन्यात संजूने नाबाद १०९ आणि तिलकने नाबाद १२० धावा केल्या होत्या. तसेच तिलकने १३ नोव्हेंबरला नाबाद १०७ धावा केल्या होत्या. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२०मध्ये शतक केले होते. त्याने २०२३च्या दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यात १०० (५६ चेंडू) धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० विश्वचषकातील शतकाचा मान सुरेश रैनाला जातो. त्याने २०१०मध्ये १०१ (६० चेंडू) धावा केल्या होत्या. टी२० विश्वचषकातील ते भारताचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव शतक ठरले. त्यावेळी भारताची सुरूवात ४ धावांवर एक विकेट अशी झाली होती, त्यामुळे रैनाच्या या शतकाचे महत्व अधिक. हा सामना भारताने १४ धावांनी जिंकला होता.

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले आहे. हे त्याने २०१५मध्ये धरमशालेत केले होते. त्यावेळी त्याने ६६ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या.

दोन्ही संघात ३५ टी२० सामने खेळले गेले असून भारताने २१ सामने जिंकले आहेत. यामधील दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले असून एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याचबरोबर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत टी२० विश्वचषकात ७ सामने खेळले गेले. ज्यामध्ये भारताने ५ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेला २ सामन्यात विजय मिळवता आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---