कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र काही काळानंतर जैव सुरक्षित वातावरणात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा दृष्टीने प्रेक्षकांना स्टेडियमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत अवघ्या 50 ते 60 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला. मात्र 4 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या टी20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
न्यू साउथ वेल्स (एनएसडब्लू) सरकारने 7 डिसेंबरपासून स्टेडियमवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्या टी20 सामन्यात (8 डिसेंबर) मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीवर कोणतेही निर्बंध येणार नाही.
एनएसडब्ल्यू प्रीमियर ग्लेडिस बेरेजिकीलयान द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की “ 7 डिसेंबरपासून दर्शकांना स्टेडियममध्ये पूर्ण क्षमतेने परवानगी दिली जाऊ शकते त्यामुळे न्यू साऊथ वेल्समधील आयुष्य पूर्णपणे वेगळे असेल.”
या निर्णयाचा अर्थ असा की तिसरा आणि अंतिम टी20 सामना सिडनी क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत खेळला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी (2 डिसेंबर) कॅनबेरा येथील मानुका ओव्हल स्टेडियममध्ये खेळला जाईल, तर दुसरा टी20 सामना रविवारी (4 डिसेंबर) सिडनी येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
ट्रेंडिंग लेख –
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव