भारतीय संघाचा मध्यम फळीतील विश्वासाचा फलंदाज विराट कोहलीच्या वाईट फॉर्ममुळे संघ आणि चाहते चिंताग्रस्त आहेत. तसेच यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यामुळे भारतीय संघ निवडकर्ते त्याच्याबद्दल सतत प्रश्नोत्तरे करण्यात व्यस्त आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरूण धुमाळ यांनी विराटबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने भारताला अनेक सामन्यात लक्ष्याचा विजयी पाठलाग करून दिला आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. तसेच त्याला वेस्ट इंडिज पाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यातूनही वगळण्यात आले. यामुळे संघातील त्याच्या जागेवर काही आजी माजी खेळाडूंनी परखड टिका केेली आहे. तर धुमाळ यांनी त्याला टी२० विश्वचषकात घेणार की नाही हे सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून आहे, असे म्हटले आह. तर एशिया कपसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे.
विराटला लागोपाठ दोन दौऱ्यात विश्रांती दिल्याने दिग्गजांबरोबरच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींंनी तर त्याला वाईट फॉर्ममध्ये असल्याने सतत खेळवले पाहिजे असे सल्लेही दिले आहेत. एशिया कप आणि टी२० विश्वचषक या स्पर्धांना काहीच दिवस शिल्लक आहेत.
“भारतीय संघासाठी पुढील मालिका महत्वाची असणार आहे. त्यामध्ये अधिक धावा करणे आवश्यक आहे. मालिका जिंकली तर संघ आणखी मजबूत होत पुढील सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करू शकतो. विराटला टी२० विश्वचषकासाठी संघात घेणे हे पूर्णपणे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे,” असे धुमाळ यांनी म्हटले आहे.
धुमाळ यांनी युट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले, “विराट हा एक साधारण खेळाडू नाही. तो एक महान खेळाडू आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे योगदान अविश्वसनीय आहे. आम्हाला पण त्याने लवकरात लवकर फॉर्ममध्ये यावे अशी आशा आहे. जेव्हा संघाच्या निवडीची चर्चा होते तेव्हा कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचे हे सगळे निर्णय निवडकर्तेच घेतात.”
विराटने भारताकडून २००८मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने आतापर्यंत १०२ कसोटी, २६२ वनडे आणि ९९ टी२० सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये मिळून त्याने ७० शतके आणि १२२ अर्धशतके केली आहेत. त्याची ही आकडेवारीच सांगते की त्याची कारकिर्द किती मोठी आणि भारतीय संघासाठी महत्वाची आहे. चोहोबाजूंनी विराटवर टिका होत असताना भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही त्याची पाठराखण केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या टी२०पूर्वी कार्तिकची वेस्ट इंडिजला चेतावणी; म्हणाला, ‘मालिका जिंकण्याच्या हेतूनेच…’
बहुप्रतिक्षित भारत-विंडीज चौथ्या टी२० सामन्यात पाऊस मोडता घालणार? वाचा संपूर्ण रिपोर्ट
काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण