---Advertisement---

जर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनल टाय झाली तर…

On: शनिवार, मार्च 7, 2020 2:04 PM
---Advertisement---

मेलबर्न। उद्या(८ मार्च) महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरुवात होईल.

मागील काही दिवसांमधील क्रिकेट सामन्यांचे निकाल पाहता अनेकांना प्रश्न पडला आहे की जर या सामन्यात निर्धारित २०-२० षटकांनंतर बरोबरी झाली तर विजेतेपदाचा निकाल कसा लागणार.

यासाठी आयसीसीने २०१९ पुरुष वनडे विश्वचषकानंतर नवीन नियम आणला आहे. त्या नियमानुसार जर अंतिम सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर घेण्यात येणार आहे. तसेच जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर जोपर्यंत विजेता मिळत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर पुन्हा पुन्हा घेतली जाईल.

तसेच जर एखादी फलंदाज एका सुपर ओव्हरमध्ये बाद झाली आणि जर सामन्यात दुसरी सुपर ओव्हर घेण्याची वेळ आली तर ती फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे १ गोलंदाज दोन सुपर ओव्हर सलग टाकू शकत नाही.

त्याचबरोबर कोणत्याही कारणाने सुपर ओव्हर घेण्यात कोणताही अडथळा आला तर दोन्ही संघांना विजेता घोषित केले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

पत्नी हेलीला भारताविरुद्ध वर्ल्डकप फायनल खेळताना पाहण्यासाठी स्टार्क परतणार ऑस्ट्रेलियाला

टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये खेळाडू नाही चाहते मोडू शकतात हा मोठा विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---