आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) सातव्या पुरुष टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहिर केले आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या दरम्यान खेळला जाणार आहे.
या विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार आहेत. यातील भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, विंडीज, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या पहिल्या 8 संघांना 2018च्या आयसीसी टी20 क्रमवारीनूसार थेट प्रवेश मिळाला आहे. तर बाकीचे 4 संघ पात्रता फेरीच्या सामन्यातून निवडले जाणार आहे.
24 ऑक्टोबर, 2020ला होणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने सुपर 12च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. हा सामना सिडनी येथे खेळला जाणार आहे.
आयसीसी टी20 क्रमवारीतील पहिले दोन संघ एकाच गटात ठेवणे योग्य नाही यामुळे या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ वेगवेगळ्या गटात आहेत.
आयसीसी टी20 क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे दोघेही सुपर12मध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार नाही.
त्याचबरोबर राजकीय प्रभावामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एशिया क्रिकेट परिषदेच्या एशिया कप या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र ते आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार नाही.
2018च्या एशिया कपमध्ये हे दोघे समोरा-समोर आले होते. यामध्ये भारताने तो सामना जिंकला होता. तसेच डिसेंबर, 2012मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यामध्ये 2 टी20 आणि 3 वन-डे सामने खेळले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०२० टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पहा येथे
–तब्बल १६ महिन्यांनी किंग कोहली ठरला या गोष्टीत दुर्दैवी
–हिटमॅन रोहित शर्मासाठी ३१ जानेवारी ठरणार कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण