---Advertisement---

भारत-पाक सामन्याची उत्सुकता शिगेला! रेस्टोरंट, बारसह चहाच्या स्टॉलवरही चाहत्यांना मिळणार सूट

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 5:44 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकातील सर्वात आतुरतेने ज्या सामन्याची वाट पाहिली जात आहे, तो म्हणजे २४‍ ऑक्टोबरला खेळला जाणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता एवढी वाढली आहे की, ग्वाल्हेरच्या एका रेस्टॉरंटमध्ये या सामन्यादिवशी चक्क १०%  सूट ठेवण्यात आली आहे, तसेच एका बारमध्ये दोन पेग घेतल्यावर एक पेग मोफत देण्यात येणाार आहे. तर एका चहा विक्रेत्यानेही त्यादिवशी चहावर दोन रुपयांची सूट दिली आहे.

दोन पेग घेतल्यावर मिळणार अजून एक पेग मोफत
रॉक्सीपुलजवळ असलेल्या महाराजा बारमध्ये २४ ऑक्टोबरच्या भारत – पाकिस्तान सामन्याच्या आनंदात एक अप्रतिम ऑफर ठेवण्यात आली आहे. सामना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत या बारमध्ये दोन पेग घेतल्यावर एक पेग मोफत दिला जाणार आहे. बार चालक विष्णु शिवहरेंनी याबाबात माहिती दिली. ते म्हणाले की, बारच्या प्रत्येक हॉलमध्ये आणि रूममध्ये एलईडी टीव्ही लावले जात आहेत, ज्यावर त्या दिवशी दिवसभर भारत-पाकचा सामना चालेल.

रेस्टोरंटमध्ये कपल्सला मिळणार १०% सूट
ग्वाल्हेरच्या कटोराताल रोडवरचे सुप्रसिद्ध सेस्टोरंट 7SPICE मध्येही भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी धमाकेदार ऑफर ठेवण्यात आली आहे. या रेस्टोरंटमध्ये सामन्यादिवशी १०% सूट दिली जाणार आहे. या रेस्टोरंटच्या मालक प्रीति पाल यांनी याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, येथे भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळेदरम्यान डिनरसाठी येणाऱ्या कपलला १०% डिस्काउंट ऑफर केला जात आहे. येथे एलइडी टीव्हीवर सामना पाहण्याची व्यवस्था केली गेली आहे. सोबतच, ऑफरमध्ये सूट दिली जात आहे. पहिल्यांदाच सामन्याच्या उत्सुकतेमुळे ही ऑफर दिली जात आहे. सामन्याविषयी प्रत्येकाच्या तोंडात चर्चा असते.

७ रुपयांचा चहा मिळणार ५ रुपयांमध्ये
भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता चौकातील चहाच्या टपरीवरही दिसत आहे. फूलबागमध्ये कुशवाह टी पॉइंटचे चालक अर्पिक कुशवाह यांनीही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानिमित्त एक खास ऑफर ठेवली आहे. सामन्याच्या दिवशी त्यांनी रोज ७ रुपयांना विकला जाणारा कटिंग चहा ५ रुपयांमध्ये ठेवला आहे, या चहासोबत स्पेशल मलाईही दिली जाणार आहे. त्यांनीही अशाप्रकारची ऑफर पहिल्यांदाच ठेवली आहे. अर्पितने सांगितल की, येथे लोकं रोज चर्चा करतात. विश्वचषकात कधीच न हारण्याचे रेकॉर्ड भारत यावेळीही कायम राखेल.

दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकात त्यांच्या अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी दोन सराव सामने खेळले आणि त्यामध्ये दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यांमध्ये भारताने पहिल्यांदा इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाला धुळ चारली. रोहित शर्मा, ईशान किशन, आणि केएल राहुल या भारतीय फलंदाजांनी या सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली, तसेच रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहनेही चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. अशात भारत पाकिस्तानविरुद्ध त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत- पाकिस्तान सामन्यावर लागला ‘इतक्या’ कोटींचा सट्टा, आकडा वाचून सरकेल पायाखालची जमीन

वर्ल्डकपसाठी येण्यापूर्वी बाबरला काय म्हणाले पाकिस्तानी पंतप्रधान? स्वतः केला खुलासा

‘आता न्यूझीलंडला पळू द्यायचे नाही, पण भारतालाही सोडायचे नाही’, माजी पाक खेळाडूचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---