इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने मागच्या महिन्यात क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी झाला नाही. तसेच तो आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांमध्येही सामील होणार नाही. अशात त्याच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, तो आगामी टी२० विश्वचषकात खेळणार आहे की नाही? इंग्लंचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड यांनी चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
सिल्वरवुडने सांगितले आहे की, आगामी टी २० विश्वचषक संघात सामील होण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने बेन स्टोक्सवर सोडलेला आहे. त्याने मागच्या महिन्यात मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. त्यानंतर त्याने अद्याप क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलेले नाही. स्टोक्स याआधी भारतात भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळला असून सध्या इंग्लंडमध्ये चालू असलेल्या कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली आहे.
आगामी टी २० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. विश्वचषकासाठी काही संघांनी त्याचे संघ घोषित केले असून येत्या काही दिवसात राहिलेले संघही घोषित होतील. इंग्लंडचा विश्वचषकासाठीचा संघ गुरुवारी (९ सप्टेंबर) घोषित होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही, विश्वचषकासाठी स्टोक्स उपलब्ध असेल की नाही? याबाबद संभ्रमाची स्थिती आहे. क्रिस सिल्वरवुडने याबाबत बीबीसीला माहिती दिली आहे.
सिल्वरवुडने म्हटले, “इंग्लंड टी२० विश्वचषकात स्टोक्सच्या सहभागी होण्याचा निर्णय त्याच्यावर सोडत आहे. मी त्याच्यावर कोणताच दबाव नाही टाकणार किंवा त्याला लवकर परतण्यासाठी म्हणणार नाही. त्याला जे काही सहकार्य हवे आहे, ते त्याला मिळेल. मी त्याला जेवढा होईल तेवढा वेळ देईल. मात्र, लोकं त्याच्याशी बोलत आहेत. माझी त्याच्यासाठी एकमात्र चिंता त्याची तब्येत आहे. मला फक्त या गोष्टीची पुष्टी करायची आहे की, तो ठीक आहे. एकदा जर आम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले की, बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेपुढे बलाढ्य दक्षिण आफ्रिका नतमस्तक, ७८ धावांनी तिसरा वनडे जिंकत मालिकेवरही कोरले नाव
कॅप्टन कोहली पुन्हा तोडणार लाखो चाहत्यांची मने? अश्विनच्या पाचव्या कसोटीतील स्थानाविषयी दिले संकेत
महिला टी२० रँकिंगमध्ये भारतीयांचा दबदबा, शेफाली अव्वलस्थानी कायम; स्म्रीती, दिप्तीही भारीच!