---Advertisement---

टी२० विश्वचषक: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने एकतर्फी विजय 

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 12:39 AM
---Advertisement---

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत शनिवारी (३० ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. हा इंग्लंडचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. त्यामुळे इंग्लंडने त्यांचा उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग सोपा केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १२५ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी १२६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने ११.४ षटकात २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

इंग्लंडकडून १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जोस बटलरने शानदार सुरुवात केली होती. या दोघांनी सलामीला ६६ धावांची भागीदारी केली. त्यांची जोडी ऍडम झम्पाने रॉयला २२ धावांवर बाद करत तोडली. यानंतर डेव्हिड मलानही ८ धावांवर लवकर बाद झाला. पण, बटलरला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. या दोघांनी इंग्लंडला १२ व्या षटकात १२६ धावसंख्या गाठून देत विजय मिळवून दिला.

बटलरने यादरम्यान त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७१ धावांची नाबाद खेळी केली. तसेच बेअरस्टो ११ चेंडूत २ षटकारांसह १६ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. हे दोघेही प्रत्येकी १ धाव करून बाद झाले. ग्लेन मॅक्सवेलही ६ धावांवर बाद झाला. तर, मार्कस स्टॉयनिसला भोपळाही फोडता आला नाही.

एका बाजूने विकेट्स जात असताना कर्णधार ऍरॉन फिंचने दुसरी बाजू संभाळली होती. त्याने ४४ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त मॅथ्यू वेड(१८), ऍश्टन एगार (२०), पॅट कमिन्स (१२) आणि मिशेल स्टार्क (१३) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया २० षटकांत सर्वबाद १२५ धावाच करुच शकले.

इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर ख्रिस वोक्स आणि टायमल मिल्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच आदील राशिद आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषक: हसंगाच्या हॅट्रिकवर मिलरचे षटकार भारी! दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय

दु:खद! एका कसोटीत १०० धावा अन् १० विकेट्स घेणाऱ्या दिग्गज ऑसी क्रिकेटरने निधन

अफगाणिस्तानी चाहत्यांचा धुमाकूळ! तिकीट नसतानाही स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, आयसीसीने घेतली दखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---