दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पार पडला. पाकिस्तानने या सामन्यात १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान विश्वचषकात १२ वेळा आमने-सामने आले होते आणि प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली होती. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने भारताचा हा विक्रम मोडला.
भारताने या सामन्यात पाकिस्तानला जिकण्यासाठी १५२ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानने हे लक्ष्य सहज गाठले आणि सामना जिंकला. आपण या लेखात पाच प्रमुख कारणे पाहणार आहोत, ज्यामुळे भारतीय संघ विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच पराभूत झाला आहे.
नाणेफेक पराभूत
दुबईमध्ये खेळले गेलेल्या सामन्यांचा विचार केला तर, नाणेफेकीने सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला नाणेफेक जिंकता आली नाही. बाबर आजमने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब केला नाही आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबईमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघ शक्यतो जिंकलेला पाहायला मिळाला आहे. अशातच दव पडल्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजांसाठी परिस्थिती अजूनच अनुकूल झाली.
भारताचे सलामीवीर ठरले अपयशी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर संघाचा चांगली सुरुवात देण्याची महत्वाची जबाबदारी होती. मात्र, दोन्ही सलामीवीरांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. रोहित पहिल्याच चेंडूवर आणि एकही धाव न करता बाद झाला. तसेच केएल राहुलने ८ चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या ३ धावा करून तोदेखील बाद झाला. रोहीत आणि राहुल स्वस्तात बाद झाल्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ पिछाडीवर पडला. त्यानंतर संघाला सामन्यात पुन्हा पुनरागमन करता आले नाही.
सूर्यकुमार, हार्दिक आणि जडेजा ठरले फ्लॉप
रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने चांगली सुरुवात केली होती, पण तो हसन अलीच्या गोलंदाजीवर अवघ्या ११ धावा करून बाद झाला. तसेच कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकार हार्दिक पंड्या मोठे शॉट खेळेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती, पण हार्दिकने अपेक्षाभंग केला.
त्याव्यतिरिक्त रविंद्र जडेजाही काही खास कमाल करू शकला नाही. जडेजाने १३ चेंडूत १३ धावा केल्या आणि तोही तंबूत परतला. या तिघांनी केलेल्या खराब प्रदर्शनामुळे विराटने केलेल्या उत्कृष्ट खेळाचीही काही उपयोग होऊ शकला नाही. परिणामी संघाला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.
भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळाली नाही
सामन्यात भारतीय गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. १५२ धावांचे रक्षण करत असताना पाकिस्तानच्या डावाच्या सुरुवातीच्या काही षटकांमध्ये विकेटची गरज होती, पण तसे झाले नाही. सामन्यात भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, आणि जसप्रीत बुमराह या तिघांना एकही विकेट घेता आला नाही.
तसेच या गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना जास्त धावा करण्यापासून रोखताही आले नाही. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान सुरुवातीपासून आक्रमक अंदाजात दिसले आणि सेट झाल्यानंतर त्यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल करता आले असते
पाकिस्तानविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर अनेक दिग्गजांनी या सामन्यात निवडलेल्या भारताच्या प्लेइंग इलेव्हवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सामन्यात अनुभवी रविचंद्रन अश्विनला खेळवले गेले नाही. तसेच सध्या चांगल्या फार्ममध्ये असलेल्या शार्दुल ठाकुरलाही या सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली नाही. याव्यतिरिक्त इशान किशन या सामन्यात हार्दिक पांड्यापेक्षा चांगला फिनिशर ठरू शकला असता.
महत्त्वाच्या बातम्या –
शरमेची बात! भारताच्या पराभवानंतर काश्मीरच्या तरुणांना मारहाण; व्हिडिओ आला समोर
तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल