टी२० विश्वचषक २०२१ ची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) सुपर १२ फेरीला सुरुवात झाली आहे. रविवारी सुपर १२ संघापैकी भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी संघांमधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
या सामन्यासाठी दोन्ही देशांचे समर्धक उत्सुक आहेत आणि खेळाडूंना मैदानावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंचा आणि संघाचा उत्साह वाढवण्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी त्याच्या संघाच्या समर्थनार्थ समोर आला आहे.
अफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या ठीक आधी त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून दोन फोटो पोस्ट केले आहेत. अफ्रिदी या फोटोत टी-२० विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या ऑफिशल जर्सीमध्ये दिसत आहे. या जर्सीवर त्याचा आवडीचा १० नंबर छापलेला दिसत आहे. त्याने ट्वीटरवर हे फोटो शेअर केले आहेत आणि सोबतच कॅप्शनमध्ये तो सामन्यादिवशी ही जर्सी घालणार असल्याची माहितीही दिली आहे.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1451933330027466752
अफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीत पाकिस्तान संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. तसेच त्याने बराच काळ पाकिस्तान संघाचे नेतृत्वही केले आहे. असे असले तरी, तो त्याच्या बेताल वक्तव्यांसाठी ओळखला जातो. त्याने अनेकदा भारताविरोधात विवादास्पद वक्तव्य केली आहेत. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो मैदानाच्या बाहेर बसून खेळाडूंना प्रोस्ताहन देताना दिसू शकतो.
अफ्रिदी पाकिस्तानसाठी खेळत होता, तेव्हा विश्वचषका पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवला आलेला नाही. पाकिस्तान संघ आतापर्यंत एकून १२ वेळा विश्वचषकात भारतासोबत भिडला आणि त्यापैकी एकदाही विजय मिळवू शकला नाही. भारताने पाकिस्तानला पाच वेळा टी-२० विश्वचषकात आणि सात वेळा एकदिवसीय विश्वचषकात पराभुत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहिद आफ्रिदीने केले मान्य, भारत-पाक महामुकाबल्यात विराटसेनेचे पारडे राहिल जड
बाबर-रिझवान नाहीतर ‘हा’ पाकिस्तानी फलंदाज ठरू शकतो भारतासाठी सर्वात धोकादायक
‘विराट नाही म्हटला असला तरी, त्याच्यावर दबाव असणार’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया






