टी२० विश्वचषकामध्ये रविवारपासून (२४ ऑक्टोबर) भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. भारताविरुद्ध नेहमी आग ओकणाऱ्या शाहिद आफ्रिदीला टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानला आणखी एक पराभव स्वीकारावा लागू शकतो याची भीतीही वाटत आहे.
आफ्रिदीने विश्वास व्यक्त केला आहे की या दोन्ही संघांपैकी तोच संघ विजयी होईल, जो हृदय आणि डोक्याचा योग्य वापर करेल. विश्वचषक स्पर्धेतील आधीच्या विक्रमांमुळे आणि सध्याच्या फॉर्ममुळे भारताला विजयाचा सर्वात मोठा दावेदार मानले जात आहे.
एका टीव्ही चॅनलशी बोलताना आफ्रिदीला विचारण्यात आले की, या सामन्यात कोण विजयाचा दावेदार असेल? भारतीय संघ हा विजयाचा दावेदार असेल असे आफ्रिदीला वाटते, तो म्हणाला, ‘दोन्ही संघ अनुभवी आहेत. भारतीय संघ १०-१५ वर्षांपासून चांगला खेळ खेळत आहे. मला वाटते की बीसीसीआयने भारतीय संघावर खूप गुंतवणूक केली आहे. हा सामना हृदय आणि डोक्याने खेळणे गरजेचे असेल. भारताचे पारडे थोडे जड आहे. बघूया कोणता संघ दबाव झेलू शकतो. मैदानात उतरतांना चांगली मानसिकता आणि देहबोली यांची आवश्यक आहे.
आफ्रिदी पुढे म्हणाला की, भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना त्यांचे शंभर टक्के योगदान द्यावे लागतील. तो म्हणाला, ‘घाबरण्याची गरज नाही. दबावावर मात करावी लागेल. खेळाडूंना त्यांच्या खेळाचा आनंद घ्यावा. मैदानात तुम्ही तुमचे शंभर टक्के द्या. सामना संपल्यावर हॉटेलमध्ये जाताना असे वाटायला नको की अजून थोडे चांगले खेळलो असतो तर निकाल काही वेगळा असता. चांगले खेळा आणि परिणामांची पर्वा करू नका.
विश्वचषक सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध नेहमीच वरचष्मा राहिला आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झालेला विजयाची परंपरा आजही कायम आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत ७ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी -२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला ५ वेळा हरवले आहे. म्हणजेच एकूणच भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १२ वेळा विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर-रिझवान नाहीतर ‘हा’ पाकिस्तानी फलंदाज ठरू शकतो भारतासाठी सर्वात धोकादायक
‘विराट नाही म्हटला असला तरी, त्याच्यावर दबाव असणार’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया
‘भारतीय खेळाडूंना झोपेच्या गोळ्या द्या’; मोठ्या सामन्यापूर्वी बरळला पाकिस्तानचा शोएब अख्तर