टी२० विश्वचषकाच्या ३३ व्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन संघ आमने सामने होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. भारतीय संघाला स्पर्धेतीत त्यांचे आव्हान कायम ठेवण्यासाठी आणि अफगाणिस्तानला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत २० षटकांमध्ये मोठी धावसंख्या केली. यामध्ये संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दिलेले योगदान बहुमूल्य होते. तसेच या सलामीवीर जोडीने टी-२० विश्वचषकातील एक मोठा विक्रमही स्वत:च्या नावावर केला आहे.
सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुलने अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात १४० धावांची भागीदारी केली आहे. तसेच टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघासाठी सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी ठरली आहे. या सामन्यात रोहितने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. तसेच केएल राहुलने ४८ चेंडीत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या.
टी२० विश्वचषकात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत हे दोघे पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या जोडीचे नाव येते. त्यांनी २००७ साली इंग्लंडविरुद्ध १३६ धावांची भागीदारी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीचे नाव आहे, ज्यांनी २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध १०६ धावांची भागीदारी केली होती.
दरम्यान, सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाने तुफानी खेळी करून त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताने मर्यादित २० षटकांमध्ये दोन विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या आणि अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये सलामीवीर रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ आणि केएल राहुलने ७८ चेंडूत ६९ धावा केल्या. यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्यानेही (३५) संघाच्या धावसंख्येत महत्वाचे योगदान दिले.
यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानला २११ धावांचा पाठलाग करताना २० षटकात ७ बाद १४४ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचा झंझावात! अफगाणिस्तानविरुद्ध ७४ धावांच्या खेळीसह जयवर्धनेच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
पंतने अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले ३ षटकार अन् धोनीला ‘या’ विक्रमात टाकले मागे
रोहित-राहुल जोडीची कमाल! तब्बल १४० धावांच्या भागीदारीसह मोठा विक्रम केला नावावर