---Advertisement---

कधी, कुठे आणि कसा पाहाल टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 7:00 AM
---Advertisement---

दुबई। टी२० विश्वचषकात रविवारी(३१ ऑक्टोबर) मोठा सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आणि स्पर्धेतील आव्हान बळकट करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडसाठी रविवारी होणारा सामना टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील त्यांचा प्रत्येकी दुसरा सामना असणार आहे. या दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. विशेष म्हणजे दोन्ही संघांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने १० विकेट्सने, तर न्यूझीलंडने ५ विकेट्सने पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारला आहे.

त्यामुळे आता सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या आणि भारत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचमुळे रविवारी होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना असणार आहे.

आमने-सामने कामगिरी
भारत आणि न्यूझीलंड संघात यापूर्वी २ वेळा टी२० विश्वचषकात सामना झाला आहे. दोन्ही वेळेस न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध टी२० विश्वचषकातील विजयाची प्रतिक्षा आहे. तसेच आत्तापर्यंत हे दोन संघ टी२० क्रिकेटमध्ये १६ सामने झाले आहेत. त्यातील ६ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडने ८ सामने जिंकले आहेत. तसेच २ सामने बरोबरीत सुटले होते, ज्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारलेली.

टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

१. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना केव्हा होणार?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी खेळला जाणार आहे.

२. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड कुठे खेळवला जाणार ?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाईल.

३. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड किती वाजता सुरु होणार ?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्या. ७.०० वाजता नाणेफेक होईल.

४. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 
भारत –  केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, इशान किशन, रविचंद्रन अश्विन , राहुल चाहर

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विलियम्सन(कर्णधार), जेम्स नीशम, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट(यष्टीरक्षक), मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, ऍडम मिल्ने, टॉड ऍस्टल, मार्क चॅपमन

महत्त्वाच्या बातम्या – 

अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचा निवृत्तीचा निर्णय, काही दिवसांपूर्वीच धोनीला पछाडत ठरलेला यशस्वी टी२० कर्णधार

ऍरॉन फिंचचा इंग्लंडविरुद्ध टी२० मध्ये मोठा विक्रम! कोहलीला मागे टाकत ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान

न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवायचा असल्यास ‘हे’ तीन निर्णय टीम इंडियासाठी ठरू शकतात फायदेशीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---