आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ ची ३६ वी लढत न्यूझीलंड विरुद्ध नामिबिया संघांमध्ये होणार आहे. शारजाहच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आपली दावेदारी पक्के करण्यावर न्यूझीलंडची नजर असेल. नामिबियाला त्यांच्या मागील सामन्यात पाकिस्तान संघाने ४५ धावांनी पराभूत केले होते. तर न्यूझीलंडने स्कॉटलँडवर १६ धावांनी विजय मिळवला होता.
न्यूझीलंडचा संघ सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे नामिबियाला पराभूत करत न्यूझीलंडचा संघ गट २ मधून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ बनू इच्छित असेल. न्यूझीलंडपूर्वीच पाकिस्तान संघाने सलग ४ सामने जिंकत गट २ मधून सर्वप्रथम उपांत्य फेरीत धडक मारली आहे. परंतु जर न्यूझीलंड संघावर नामिबिया संघ भारी पडला तर भारतीय संघाला याचा फायदा होऊ शकतो.
न्यूझीलंड संघासाठी या सामन्यातही सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्याने मागील स्कॉटलँडविरुद्धच्या सामन्यात ५६ चेंडूंमध्ये ९३ धावांची ताबडतोब खेळी खेळली होती. परंतु त्यांचा दुसरा सलामीवीर डॅरेल मिशेल विशेष फॉर्ममध्ये नाही. याबरोबरच कर्णधार केन विलियम्सनही अद्याप त्याच्या लौकिकास साजेशी खेळी खेळू शकलेला नाही. परंतु मधल्या फळीत डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम हे आक्रमक खेळाडू मोठ्या खेळी खेळत नामिबियाला धाराशाही पाडू शकतात.
दुसरीकडे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या नामिबिया संघाच्या गोलंदाजांना चांगले प्रदर्शन करावे लागेल. तसेच सलामीवीरांनाही संघाला भक्कम सुरुवात करून द्यावी लागेल. याव्यतिरिक्त डेविड विसेच्या प्रदर्शनावरही सर्वांच्या नजरा असतील.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, केन विलियम्सन (कर्णधार), डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ऍडम मिल्ने, टिम साउथी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट
नामिबियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्रेग विल्यम्स, स्टीफन बार्ड, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), डेव्हिड विसे, मायकेल व्हॅन लिंजेन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, झेन ग्रीन (यष्टीरक्षक), निकोल लोफ्टी-ईटन, रुबेन ट्रम्पेलमन, बेन शिकोंगो
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध स्कॉटलँड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
टीम इंडियाला अजून एका मोठ्या विजयाची आस, स्कॉटलँडशी पहिल्यांदाच करणार दोन हात
टी२० संघात पुनरागमन झाल्याने अश्विन झाला भावुक, तिखट प्रत्युत्तराने टीकाकारांना केले गपगार