तब्बल ५ वर्षानंतर होणार्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी नेदरलँड्सच्या संघाने आपला १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. यामध्ये नेदरलँड्सचे नेतृत्वपद यंदाच्याही विश्वचषक स्पर्धेत पीटर सिलर करणार आहे. तसेच यामध्ये १२ खेळाडूंचे देखील पुनरागमन झाले आहे. जे २ वर्षांपूर्वीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीत खेळले होते.
तसेच विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये संघातून बाहेर असलेल्या ३७ वर्षीय स्टीफन मायबर्गने देशांतर्गत स्पर्धेत तसेच इतर आंतरराष्ट्रीय खेळाची स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले होते. ज्यामुळे त्याला यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळाली. तसेच टोबियास विसे आणि शेन स्नेटर देखील राखीव खेळाडू म्हणून संघात सामील झाले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत सामील होण्याची नेदरलँड्सची ही चौथी वेळ आहे.
मायबर्गकडे मागील टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या चांगला अनुभव आहे. ज्यामध्ये त्याने १४५.८३ च्या स्ट्राइक रेटने २८० धावा केल्या होत्या. ज्यात त्याची सरासरी ३१.११ अशी होती. तर ३१ वर्षीय लोगान वैन बिक आणि २१ वर्षीय बास डी लिडेचे देखील संघात पुनरागमन झाले आहे.
डी लिडेचे वडील देखील एक क्रिकेटर होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नेदरलँड्सकडून १९९६ ते २००७ पर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत खेळले होते. तसेच फलंदाजीसाठी नेदरलँड्सने अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश केला आहे. ज्यामध्ये ४१ वर्षीय रयान टेन डोशेट आणि रुलोफ वॅन डर मेरवे सारख्या खेळाडूंना निवडण्यात आले आहे. जे मधल्या फळीत संघासाठी चांगली खेळी करू शकतात. त्याचबरोबर मॅक्स ओ डॉड, बेन कूपर आणि स्कॉट एडवर्ड्स सोबतच मायबर्गचा अनुभव नेदरलँड्सच्या फलंदाजी विभागात मजबुती प्रदान करू शकतो.
तसेच नेदरलँड्सचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू सिलारकडे गोलंदाजीसाठी देखील भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. तो २०१९ मध्ये झालेल्या पात्रता फेरीच्या निकालानंतर यूएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी खूप उत्साहित असेल. तेव्हा त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पॉल वॅन मिकेरेन, टीम वॅन डर गुग्टेन, फ्रेड क्लासेन आणि ब्रँडन ग्लोवर यांसारखे वेगवान गोलंदाज विरोधी संघावर चांगली अडचण निर्माण करू शकतात.
???????? The "Oranje" squad for the @T20WorldCup ????
More info ???? https://t.co/IPpjThMky8 #CricketNL #T20WorldCup pic.twitter.com/ABHxbUDcxZ
— Cricket????Netherlands (@KNCBcricket) September 10, 2021
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीत नेदरलँड्सचा संघ अ गटात आहे. जिथे त्यांच्यासोबत आयर्लंड, नामिबिया आणि श्रीलंका हे संघ आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी नेदरलँड्सचा संघ –
पीटर सीलार (कर्णधार), कॉलिन एकरमॅन, फिलिप बोईसेवेन, बेन कूपर, बास डी लीडे, हॉट एडवर्ड्स, ब्रँडन ग्लोवर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओ डॉड, रयान टेन डोशेट, लोगान वॅन बीक, टीम वॅन डर गुग्टेन, रूलोफ वॅन डर मेरवे, पॉल वॅन मिकेरेन.
महत्त्वाच्या बातम्या –
–दक्षिण आफ्रिकेने नाकारले, नामिबियाने स्वीकारले! ‘या’ अफ्रिकन खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी नामिबियाकडून संधी
–रवी शास्त्री-विराट कोहली अडकले वादात! परवानगीविनाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला लावली होती हजेरी
–“कसोटी सामना रद्द होण्याचा आयपीएलशी काहीही संबंध नाही”, ईसीबीच्या मुख्य अधिकाऱ्याने केले स्पष्ट






