---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेने नाकारले, नामिबियाने स्वीकारले! ‘या’ अफ्रिकन खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी नामिबियाकडून संधी

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 1:14 AM
---Advertisement---

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नामिबियाने शुक्रवारी (१० सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेविड वीजला संघात सामील केले आहे. जो नुकताच नामिबिया क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरला होता. नामिबियाचा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच सामील झाला आहे.

नामिबिया सुरुवातीला पात्रता फेरी खेळणार असून नामिबियाचा संघ अ गटात आहे. तसेच संघाचे कर्णधारपद गेरहार्ड इरास्मसकडे सोपविण्यात आले आहे. पात्रता फेरीत जिंकल्यानंतरच नामिबियाचा सुपर १२ मध्ये समावेश होऊ शकतो.

वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू डेविड वीजने २०१६ पर्यंत ६ एकदिवसीय सामने आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. तसेच त्याला देशांतर्गत टी-२० सामन्यांचा देखील खूप मोठा अनुभव आहे. २०१९ च्या विश्वचषक पात्रता फेरीनंतर सलामीचा फलंदाज जीन पियरे कोत्जे आणि फिरकीपटू गोलंदाज जीवागो ग्रोएनवाल्डने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर लक्ष देण्याचे ठरवले.

तसेच निको डेविन सारख्या युवा खेळाडूंना त्यांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे संधी मिळाली आहे. तर, क्रिस्टी विलजोएन यांसारख्या अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर युवा फिरकीपटू गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू निकोल लॉफ्टी-इटनवर देखील सगळ्यांचे लक्ष असेल. तसेच मायकल वॅन लिंगेन सारख्या खेळाडूंना तर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा कसलाही अनुभव नाही. त्यामुळे नामिबियासाठी सुरुवातीचे सामने कठीण असणार आहे. नामिबियाला त्यांचा पहिला सामना १९ ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध खेळायचा आहे.

दरम्यान, भारतीय संघाने देखील नुकतेच बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यादरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले. अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली, तर असेही काही अनुभवी खेळाडू होते. ज्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

मात्र दुसरीकडे संघातून तब्बल ४ वर्ष लांब असलेला भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी वर्णी लागली आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यंदाच्या वेळी (मार्गदर्शक) मेंटॉर म्हणून देखील निवडण्यात आले आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी नामिबियाचा संघ –
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), स्टीफन बार्ड, कार्ल बिरकेनस्टॉक, मीचौ डू प्रीज, जान फ्रीलींक, जेन ग्रीन, निकोल लॉफ्टी-इटन, बर्नार्ड शोल्टस, बेन शिकोंगो, जेजे स्मिट, रूबेन ट्रंपलमेन, मायकल वॅन लींगेन, डेविड वीज, क्रेग विलियम्स, पिकी या फ्रांस

राखीव खेळाडू – मॉरिशस न्गुपिता

महत्वाच्या बातम्या –
रवी शास्त्री-विराट कोहली अडकले वादात! परवानगीविनाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला लावली होती हजेरी
“कसोटी सामना रद्द होण्याचा आयपीएलशी काहीही संबंध नाही”, ईसीबीच्या मुख्य अधिकाऱ्याने केले स्पष्ट
उर्वरित आयपीएलसाठी डेविड मलानऐवजी पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर केले शिक्कामोर्तब

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---