---Advertisement---

उर्वरित आयपीएलसाठी डेविड मलानऐवजी पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर केले शिक्कामोर्तब

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 12:26 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या आयपीएल १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याला जवळपास आठवड्याभराचाच कालावधी उरला आहे. यासाठी आयपीएलचे सर्व संघ यूएईला रवाना देखील झाले आहेत. तिथे सर्व संघातील खेळाडूंच्या सराव सत्राला देखील सुरुवात झाली आहे. यादरम्यान आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक खेळाडूंनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. त्यातच आता पंजाब किंग्जमधील इंग्लिश खेळाडू डेविड मलानने आपले नाव मागे घेतले आहे. त्याऐवजी उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडेन मार्करमला पंजाबने संघात सामील केले.

पंजाबने ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूने आयपीएल १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. तो म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा सलामी फलंदाज जॉनी बेयरस्टो. दरम्यान आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. एडेन मार्करमचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असणार आहे.

२६ वर्षीय मार्करमने आतापर्यंत १३ अंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३३. ७५ च्या सरासरीने ४०५ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. मार्करमची टी-२० मधील सर्वोच्च खेळीची ७० धावांची होती.

https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1436648077616578566

पंजाबने मलानला १.५० कोटी रुपये देऊन संघात सामील केले होते. मात्र तरीही मलानला आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केवळ एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याने २६ धावांची खेळी केली होती. पंजाबचा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना २१ सप्टेंबरला राजस्थान रॉयल्स विरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

तसेच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात १९ सप्टेंबरला होणार आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात ८ पैकी ६ सामन्यात विजय मिळवून १२ गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवून चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ तिसऱ्या, तर मुंबई इंडियन्सचा चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या –

मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर आता इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू आयपीएलमधून घेऊ शकतात माघार
भारीच ना! दक्षिण आफ्रिकेकडून ‘त्याने’ टी२० पदार्पण केले, नेतृत्वही केले आणि पहिल्याच चेंडूवर विकेटही घेतली
कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यास गावसकरांचा पाठिंबा, २००८ सालच्या मुंबईतील घटनेची करुन दिली आठवण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---