नवीन कर्णधार केशव महाराज याच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २८ धावांनी विजय मिळवला आहे. एकदिवसीय मालिकेतील अपयश मागे टाकत दक्षिण आफ्रिकेने विजयाची चव चाखली आहे. फलंदाज आणि गोलंदाजांनी आपआपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या. हा सामना कर्णधार केशव महाराजसाठी खूप खास ठरला, कारण या सामन्यापूर्वी त्याने कधीही टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नव्हते.
या सामन्यात त्याला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण करण्याची संधीच मिळाली नाही, तर कर्णधार होण्याचा बहुमानही मिळाला. त्याने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट देखील घेतली आणि त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात संघाचे नेतृत्व करताना, पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा केशव दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने या सामन्यात श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेला पायचीत करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात राजपक्षे याला आपले खातेही उघडता आले नाही. केशवच्या आधी हा पराक्रम नेपाळचा माजी कर्णधार पारस खडका याने केला होता. त्याने हा पराक्रम २०१४ मध्ये हाँगकाँगविरुद्ध केला होता.
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम खेळताना निर्धारित षटकात ५ गडी गमावून १६३ धावा केल्या. एडेन मार्करमने ४८ धावा केल्या, तर रिझा हेंड्रिक्स(३८) आणि क्विंटन डी कॉक(३६) यांनी दमदार खेळी खेळल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात यजमानांनी ६ गडी गमावून १३५ धावा केल्या आणि सामना २८ धावांनी गमावला.
श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चंडीमल याने ६६ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यास गावसकरांचा पाठिंबा, २००८ सालच्या मुंबईतील घटनेची करुन दिली आठवण
धोनीला टी२० विश्वषकासाठी टीम इंडियाचा मेंटर बनवल्याबद्दल कपिल देव यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
असे ३ खेळाडू ज्यांना टी२० विश्वचषकांच्या सामन्यांत धोनी नक्की खेळवण्याचा प्रयत्न करेल





