विश्वचषकात भारताविरुद्ध कधीच न जिंकलेल्या पाकिस्तानने हा विक्रम रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मोडला. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान सामना संपेपर्यंत नाबाद राहिले आणि संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने ते करून दाखवले आहे, जे मागच्या २९ वर्षात एकाही पाकिस्तानी कर्णधाराला करता आले नव्हते. असे असले तरी, या सामन्यात मिळवलेल्या दमदार विजयानंतरही पाकिस्तान संघाने कसलाही जल्लोष केला नाही आणि बाबर आजमने यापूर्वी केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बाबर आजम संघाला काही सुचना करताना दिसत आहे. त्याने सर्वात आधी खेळाडूंच्या प्रदर्शनाचे कौतुक केले आणि हा संपूर्ण संघाचा विजय असल्याचे सांगितले.
तो खेळाडूंना म्हणाला की, ‘विजय साजरा करा, पण ही गोष्ट विसरू नका की, ही फक्त सुरुवात आहे आणि संघाचे लक्ष टी-२० विश्वचषक जिंकण्याचे आहे.’ तो खेळाडूंना पुढे म्हणाला, ‘विजयाला डोक्यावर चढू देऊ नका आणि येणाऱ्या सामन्यासाठी तयार राहा. एक मोठा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघ पुढच्या सामन्यात पराभूत होतो. मात्र, यावेळी असे करायचे नाहीये.’
The captain and head coach address the players after Pakistan's historic win over India. #WeHaveWeWill pic.twitter.com/Laww5iTMzX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2021
दरम्यान, सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सात विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १५२ धावांचे लक्ष एकही विकेट न गमावता आणि १७.५ षटकात गाठले. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम (६८) आणि मोहम्मद रिजवान (७९) शेवटपर्यंत नाबाद राहिले.
याव्यतिरिक्त पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने भारताचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले आणि सामनावीर ठरला. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
मुजीब-राशिदच्या फिरकीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा! अफगाणिस्तानचा १३० धावांनी एकतर्फी विजय
‘पाजी, टीव्ही फोडला नाही ना?’ हरभजन-अख्तरच्या वादात ‘या’ खेळाडूची उडी
शरमेची बात! भारताच्या पराभवानंतर काश्मीरच्या तरुणांना मारहाण; व्हिडिओ आला समोर