---Advertisement---

हार्दिक आणि भुवनेश्वरऐवजी ‘या’ दोघांना न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात मिळावी संधी, गावसकरांनी दिला सल्ला

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 7:13 PM
---Advertisement---

टी-२० विश्वचषकात भारतीय संघ त्याचा दुसरा सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारताला त्याच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून मोठा पराभव मिळाला. यानंतर पाकिस्तानने त्यांचा दुसरा सामन्या न्यूझीलंडविरुद्ध जिंकला आणि स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा केला. आता भारताला उपांत्य सामन्यात पोहोचण्याची अपेक्षा कायम ठेवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे झाले आहे. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी हा सामना जिंकण्यासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्वाचे बदल सुचवले आहेत.

गावसकरांच्या मते भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ईशान किशनल फनिशरच्या रूपात सामील केले जाऊ शकते. तसेच शार्दुल ठाकूरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याविषयीही गावसकरांनी भाष्य केले आहे.

ते स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाले की, जर हार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसेल, तर ईशान किशनला त्याच्या पर्यायी रूपात संघात सामील केले जाऊ शकते. कारण ईशान किशन फार्ममध्ये आहे आणि सराव सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली होती. अशात त्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वापर केला जाऊ शकतो. तसेच भुवनेश्वर कुमारला जागेवर संघ शार्दुल ठाकुरला संधी देऊ शकतो.

हार्दिकला अष्टपैलूच्या रूपात विश्वचषकात संधी दिली गेली असली तरी, त्याने अद्याप गोलंदाजी केलेली नाही. तसेच तो फलंदाजीमध्येही काही खास कमाल करू शकला नाही. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या ११ धावा केल्या आणि बाद झाला.

गावसकरांनी हार्दिकच्या जागेवर ईशान किशनचे नाव सुचवले असून, त्याने विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्याने या सामन्यात ४६ चेंडूत ७० धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या दोन सामन्यात त्याने अर्थशतकी खेळी केली होती. अशात ईशान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

गावसकरांच्या मते भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकुरला संघात सामील केले गेले पाहिजे. भुवनेश्वर सध्या त्याच्या कारकिर्दीतील खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २५ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात २७ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली होती.

तसेच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात त्याने तब्बल ५४ धावा दिल्या होत्या आणि संघासाठी खूप महागात पडला होता. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने सहा सामन्यात केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. अशात चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या शार्दुल ठाकुरला संघात समील केले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडविरुद्ध चौदा वर्षांचा जुना हिशोब चुकता करणार का टीम इंडिया अन् धोनी?

‘शांत राहा आणि आनंद घ्या’, पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यापूर्वी राशिद खानची चाहत्यांना विनंती

आयपीएलच्या मेगा लिलावाची लगबग सुरू! संघांना कधीपर्यंत रिटेन खेळाडूंची द्यावी लागेल माहिती? वाचा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---