संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार सुरू आहे. या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील आतापर्यंत १२ सामने पार पडले आहेत. यामध्ये श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि नामबिया हे संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. शुक्रवार रोजी (२९ ऑक्टोबर) सुपर १२ फेरीतील २ सामने पार पडले. या सामन्यांनंतर गुणतालिके मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत.
शुक्रवारी वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला सामना पार पडला. उभय संघांनी यापूर्वीचे दोन्ही सामने गमावल्याने त्यांच्यासाठी हा सामना करा वा मरा असा होता. वेस्ट इंडिजने शेवटच्या चेंडूवर ३ धावांनी हा सामना जिंकला आहे. या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीतील त्यांचे आव्हान कायम ठेवले आहे. तर सलग ३ सामन्यात पराभव नशीबी आलेला बांगलादेशचा संघ उपांत्य फेरी सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
दुसरीकडे पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात शुक्रवार रोजीचा दुसरा सामना झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील सलग ३ तिसरा विजय होता. या सामना विजयासह पाकिस्तानने त्यांच्या गटातील गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. तर पराभूत झालेला अफगानिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
गुणतालिकेची सद्यस्थिती
गट १
१. इंग्लंड- २ सामने, २ विजय, ० पराभव
२. ऑस्ट्रेलिया- २ सामने, २ विजय, ० पराभव
३. दक्षिण आफ्रिका- २ सामने, १ विजय, १ पराभव
४. श्रीलंका- २ सामने, १ विजय, १ पराभव
५. वेस्ट इंडिज- ३ सामने, १ विजय, २ पराभव
६. बांगलादेश- ३ सामने, ० विजय, ३ पराभव
गट २
१. पाकिस्तान- ३ सामने, ३ विजय, ० पराभव
२. अफगाणिस्तान- २ सामने, १ विजय, १ पराभव
३. नामिबिया- १ सामना, १ विजय, ० पराभव
४. न्यूझीलंड- १ सामना, १ विजय, ० पराभव
५. भारत- १ सामना, ० विजय, १ पराभव
६. स्कॉटलंड- २ सामने, ० विजय, २ पराभव
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक सामन्यात ब्रावोच्या हातून घोडचूक, एका चेंडूवर खर्च केल्या चक्क १० धावा; पाहा व्हिडिओ
दुर्दैवचं अजून काय! ना स्ट्राईक मिळाली ना एकही चेंडू खेळला, तरीही रसेल शून्यावर धाबवाद; पाहा कसं?
पोलार्डने पाडला नवा पायंडा! चालू सामन्यात केले ‘असे’ कृत्य; वाचा सविस्तर






