आगामी टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या संघासाठी वाईट माहिती समोर येत आहे. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स आधी आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता तो टी२० विश्वचषकातही सहभागी होणार नसल्याचे समोर येत आहे. त्याचे टी२० विश्वचषकासाठी संघातील स्ठान निश्चित झालेले नाही. त्याने भारताविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेमधून अनिश्चित काळासाठी माघार घेतली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बेन स्टोक्स सध्या क्रिकेटविषयी विचारही करत नाहीये आणि हेच कारण आहे की, तो टी२० विश्वचषकातूनही त्याचे नाव माघारी घेऊ शकतो.
आगामी टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने १० सप्टेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांच्या संघाची घोषणा करण्यासाठी अंतिम तारीख सांगितली आहे. या तारखेपर्यंत विश्वचषकात सामील होणाऱ्या सर्व संघांना त्यांच्या संघाची घोषणा करावी लागेल. बेन स्टोक्सला इंग्लंडच्या संघात राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले जाऊ शकते. विश्वचषकासाठी प्रत्येक संघ तीन राखीव खेळाडू ठेऊ शकतात आणि ते १० ऑक्टोंबरपर्यंत त्याच्या संघात बदलही करू शकतात.
बेन स्टोक्सने ३० जुलैला क्रिकेटमधून विश्वांती घेण्याची घोषणा केली होती. आता हे पाहावे लागेल की, तो मैदानात पुनरागमन कधी करेल? त्याने भारताविरुद्धची कसोटी मालिका आणि आयपीएलमधून आधीच माघार घेतल्याचे स्पष्ट आहे. असे असले तरीही, तो टी२० विश्वचषकात मैदानात पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा होती. तो डिसेंबरमध्ये होणाऱ्या ऍशेस मालिकेतही सहभागी होईल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, आता हे कठीण वाटत आहे.
टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विश्वचषकाचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये केले गेले आहे. भारतीय संघ त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध २४ ऑक्टोबरला खेळेल. तसेच इंग्लंड त्यांचा पहिला सामना २५ ऑक्टोबरला वेस्टइंडीजविरुद्ध खेळेल.
महत्वाच्या बातम्या-
‘वैयक्तिक कटुतेमुळे अश्विनला संघात स्थान दिले नाही’, कर्णधार कोहलीवर विरोधी संघातून जहरी टीका
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर केएल राहुलला आयसीसीने ठोठावला दंड, जाणून घ्या कारण
ओव्हलमध्ये ६१ धावांची उपयुक्त खेळी करुनही पुजारा नाखुश; म्हणाला, ‘पुढच्या सामन्यात शतक ठोकणार’