टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची अखेर आता जवळ आली आहे. या स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील सर्व सामने पार पडले आहेत. आता या स्पर्धेतील उपांत्य सामने आणि अंतिम सामना बाकी आहे. यातील पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणार आहे. या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची, तर इंग्लंडसाठी चिंतादायक बातमी समोर येत आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी इंग्लंडच्या चिंतेत वाढ झाली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त झाला आहे.
डेविड मलान (Dawid Malan) याच्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) हा ऍडलेड ओव्हलमध्ये भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून बाहेर होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, शरीरात त्रास होत असल्यामुळे त्याने सराव सत्रात भाग घेतला नाही. स्पर्धेतील सर्वात खतरनाक गोलंदाज वूड हा स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि त्याने चार सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.
वुडने खबरदारी म्हणून नेटमध्ये गोलंदाजी केली नाही. नुकतेच त्याच्या उजव्या कोपरावर दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर संपूर्ण उन्हाळी हंगामात तो संघाबाहेर होता. जर वूडला उपांत्य सामन्यात खेळता आले नाही, तर त्याच्या जागी ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याला संधी मिळू शकते. वूड इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक 2022मध्ये मार्क वूडने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. त्याने ताशी 149.02 किमी वेगाने चेंडू फेकला होता.
Preparing for our #T20WorldCup semi-final at the Adelaide Oval! 🏟🏏💥 pic.twitter.com/8XqRFsmqED
— England Cricket (@englandcricket) November 8, 2022
वूडसोबतच इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज डेविड मलान हादेखील दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. याची पुष्टी संघाचा अष्टपैलू मोईन अली याने सोमवारी (दि. 07 नोव्हेंबर) केली. मलानला ही दुखापत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झाली होती, सुपर 12च्या शेवटच्या सामन्यात तो क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर तो मैदानावर उतरलाच नाही. श्रीलंकेविरुद्ध 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा संघ संघर्ष करत होता, तेव्हा मलान फलंदाजी करण्यासाठी आला नव्हता. यावरून समजते की, त्याची दुखापत किती गंभीर आहे. (T20 world cup 2022 england pacer mark wood likely to be ruled out from semi final match against india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी घोषणा! दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये टी20 लीगची सुरुवात, आयपीएलच्या 6 फ्रँचायझींनी उतरवले आपले संघ
व्हिडिओ: युरोपियन क्रिकेटमध्ये गोलंदाजाने केल्या दोन मोठ्या चुका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘कोंबडी पकड’