---Advertisement---

जरा इकडे पाहा! इंग्लंडचा गोलंदाज झालाय फिट, पाकिस्तानला करणार सळो की पळो? व्हिडिओ व्हायरल

Mark-Wood
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. जर पावसामुळे सामना रद्द झाला नाही, तर या संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मात्र, दुसरीकडे, पाकिस्तान संघासाठी धोक्याची घंटी वाजली आहे. काय आहे कारण, चला जाणून घेऊया…

पाकिस्तान संघासाठी धोक्याची घंटी वाजण्यामागील कारण इंग्लंड संघाचा घातक वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) आहे. वूड पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे कदाचित पाकिस्तान संघाच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

जोस बटलर (Jos Buttler) याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी मेलबर्न क्रिकेट मैदानावर आपल्या सर्वात वेगवान गोलंदाज मार्क वूड याला पुन्हा गोलंदाजी करताना पाहून उत्साहित आहे. मार्क वूड हा इंग्लंडच्या गोलंदाजी विभागाचा मुख्य गोलंदाज आहे. वूड जरी सराव सत्रात गोलंदाजी करताना दिसत असला, तरी त्याच्या फिटनेसविषयी अद्याप इंग्लंड बोर्डाकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. मात्र, जर तो खेळला, तर पाकिस्तानच्या चिंतेत वाढ होऊ शकते. तो भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तंदुरुस्त नसल्यामुळे खेळू शकला नव्हता. तरीही, इंग्लंड संघाने दमदार प्रदर्शन करत भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत केले होते.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने सुपर 12 फेरीत इंग्लंडसाठी अविश्वसनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे, त्याने टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकला. वूड हा इंग्लंडच्या सर्वात खतरनाक गोलंदाजांपैकी एक आहे. सध्याच्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत वूडने सर्वात वेगवान (ताशी 154. 74 किमी) चेंडू फेकला आहे. या स्पर्धेत वूड याने 4 सामन्यात 9 विकेट्स चटकावण्याची कामगिरीही केली आहे. (T20 World Cup 2022 Final Mark Wood likely to play against Pakistan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला हरवणाऱ्या बटलरने सूर्यकुमारला निवडले ‘मालिकावीर’, पण बाबरला वाटतं ‘हा’ खेळाडू जिंकणार पुरस्कार
काय सांगता! एमएस धोनी करणार भाजपमध्ये प्रवेश? गृहमंत्री अमित शाहांसोबत केली हातमिळवणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---