इंग्लंड संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाची दाणादाण उडवली. इंग्लंडने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करत ट्रॉफी उंचावली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचे आव्हान 1 षटक शिल्लक ठेवत 19व्या षटकात पूर्ण केले. इंग्लंडच्या विजयाचा हिरो अष्टपैलू सॅम करन राहिला. सामन्यातील उत्तम प्रदर्शनासाठी करनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने करनला एक खास व्यक्ती म्हणून निवडले.
सॅम करन (Sam Curran) याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 12 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त त्याची स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरी पाहून आयसीसीने करनला ‘मालिकावीर’ म्हणूनही निवडले. इतकेच नाही, तर यानंतर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) हादेखील करनच्या कामगिरीने प्रभावित झाला. त्याने करनला ‘बॉलर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणजेच ‘स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज’ निवडले.
रिकी पाँटिंगचा व्हिडिओ
आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिकी पाँटिंग त्याचा आवडता गोलंदाज निवडताना दिसत आहे. यावेळी त्याने म्हटले की, “माझ्यासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज निवडणे खूप सोपे आहे. करन हा माझ्यासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आहे.”
https://www.instagram.com/reel/Ck6ELnCotT4/?utm_source=ig_embed&ig_rid=8e0fe16f-c042-46ec-b6d3-edc1609fb928
पुढे बोलताना पाँटिंग म्हणाला की, त्याने ज्याप्रकारे मधल्या आणि शेवटच्या षटकात गोलंदाजी केली, ती खूपच कमालीची होती. पाँटिंगच नाही, तर अंतिम सामन्यातील करनची गोलंदाजी पाहून चाहतेही खूप खुश आहेत. तसेच, सोशल मीडियावर त्याचे गुणगाण गायले जात आहे.
सॅम करनची स्पर्धेतील कामगिरी
सॅम करनने अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी केलीच. मात्र, त्याने एकूण स्पर्धेतही आपल्या संघासाठी दमदार प्रदर्शन केले. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्यात संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक पटकावला. त्याने या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळले. यातील 6 डावात खेळताना त्याने 6.52च्या इकॉनॉमी रेटने 13 विकेट्स चटकावल्या. यावेळी 10 धावा देत 5 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. (T20 World Cup 2022 former cricketer Ricky Ponting picks Sam Curran as bowler of the tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला…
सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ केली 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास