सध्या चाहत्यांपासून ते पाकिस्तानी खेळाडूंपर्यंत सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघावर लागले आहे. कारण, या सामन्यात भारताने जिंकावे अशीच प्रार्थना कदाचित पाकिस्तानी संघ करत असेल. हा सामना भारताने जिंकला, तर पाकिस्तानला उपांत्य सामन्याचे तिकीट मिळवण्याची संधी मिळू शकते. मात्र, रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022मधील 30व्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. हे पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा खूपच दु:खी झाला. त्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत दु:ख व्यक्त केले.
भारताने या सामन्यादरम्यान पहिल्या 9 षटकांच्या आतच 5 विकेट्स गमावल्या, ज्यानंतर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत आपले दु:ख व्यक्त केले.
शोएब अख्तरचे ट्वीट
शोएब अख्तर याने त्याच्या ट्वीट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “भावांनो खूप घाईत आहात?” या व्हिडिओत अख्तर म्हणाला की, “मी व्हिडिओत म्हणालो होतो की, भारताला पाकिस्तानसाठी जिंकण्याची गरज आहे. पाकिस्तानला मारायचे नाहीये. हे तर पाकिस्तानला मारत आहेत. चार आऊट झाले. माहिती नाही आता पुढे काय होतंय.”
Bhaiyo bahut jaldi main hain? pic.twitter.com/QVIf9Y4bj0
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 30, 2022
अख्तरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. त्याच्या या व्हिडिओला 2.9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त व्हिडिओवर 1 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.
सामन्याचा आढावा
या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वगळला, तर भारतीय संघाचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. एकेकाळी भारत 5 विकेट्स गमावत 49 धावांवर होता. त्यावेळी सूर्याने फलंदाजीला येत 40 चेंडूत 68 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तसेच, भारताने या खेळीच्या जोरावर 20 षटकात 9 विकेट्स गमावत 133 धावा केल्या. सूर्यकुमारने या टी20 विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक साकारले. दुसरीकडे, लुंगी एंगिडीने 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी
रोहित अन् विराट फ्लॉप, पण सूर्या ऑन फायर, टी20 विश्वचषकात भारतासाठी ठोकल्या बॅक टू बॅक फिफ्टी